एकनाथ खडसे यांचे मौनच, पण अन्य नेत्यांचेच अंदाज सुरू...

.....
एकनाथ खडसे यांचे मौनच, पण अन्य नेत्यांचेच अंदाज सुरू...

पुणे : माजी मंत्री भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तीन नेते खडसे काय काय करणार ? यावर भाकीत करताना दिसत आहेत मात्र खुद्द खडसे मात्र याबाबत काहीही बोलताना दिसत नाहीत. 

इस्लामपूर येथे बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले,"खडसे जर भाजपमधून बाहेर पडले तर ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येतील."हे सांगताना त्यांच्याशी याबद्दल बोलणे झाले नाही हे सांगण्यास जयंतराव विसरले नाहीत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर मध्ये म्हणाले,"खडसे यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत आहे." भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मात्र पक्षाची बाजू सावरण्यासाठी पुढे आले ,"खडसे भाजप सोडणार नाहीत."असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षावर नाराज आहेत.त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्यावर तर ते खूप नाराज झाले.ते नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या.त्यात देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मदतीने सरकार स्थापन केले आणि ते अवघ्या काही तासात कोसळले.त्यानंतर खडसे यांना पत्रकारांनी'सिंचन घोट्याळ्यात तुमच्याकडे गाडीभर पुरावे होते.त्याच काय झालं?असं विचारल्यावर ते म्हणाले,"आमच्याकडे गाडीभर पुरावे होते मात्र दरम्यान रद्दीचे भाव वाढले तेव्हा आम्ही ते पुरावे रद्दीत विकले." 

याच काळात खडसे यांनी, "आम्हाला सोबत घेऊन निवडणूक लढवली असती तर किमान 25 जागा वाढल्या असत्या.'असेही म्हटले. परवा खडसेनी,'हे असेच सुरू राहीले तर वेगळा विचार करावा लागेल.'असं म्हटल्यावर चंद्रकांत पाटील यांनी 'खडसे भाजप सोडणार नाहीत.'असे म्हटले तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे यांच्यासाठी पायघड्या टाकल्या आहेत.तिन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खडसे काय करतील?याची भाकिते करत आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com