DySP kale transfer to nandurbar | Sarkarnama

जाभुळखेडा भुसुरुंस स्फोटात हयगय, DySP शैलेश काळेंची नंदुरबारला बदली

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 15 मे 2019

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटाच्या घटनेतहयगय केल्याचा ठपका ठेवून पोलिस प्रशासनाने कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांची नंदूरबार येथे बदली केली.

आदिवासी विकास विभागाच्या जात पडताळणी समितीत त्यांची नियुक्ती केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्‍यातील जांभुळखेडा येथे महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 पोलिस जवानांसह एक खासगी वाहन चालक ठार झाला. वाहन जाळपोळीच्या पंचनाम्यासाठी सुरक्षा
नियमाचे उल्लंघन करून शैलेश काळे यांनी जवानांना एका खासगी वाहनातून
येण्याच्या तोंडी सूचना केल्या होत्या.

पथकाच्या निघण्यापूर्वी बॉम्ब शोधक पथकाकडून रस्त्याची तपासणी केली नाही. तसेच भूसुरुंग विरोधक
वाहनांचा वापर न करता परस्पर जवानांना बोलावल्यानेच ते नक्षलवाद्यांच्या स्फोटाचे बळी ठरले, असे प्राथमिक चौकशीत आढळून आले. त्यामुळे काळे यांच्याबद्दल शहीद जवानांच्या कुटूंबामध्ये कमालीचा संताप व्यक्त केला
जात आहे. अनेकांनी त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली आहे.

शहीदांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांकडेही कुटुंबीयांनी काळे यांच्या बेजबाबदारपणामुळेच
त्यांचा हकनाक बळी गेल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाने एसडीपीओ काळे यांना तत्काळ सक्‍तीच्या रजेवर पाठविले होते. त्यानंतर आता त्यांची नंदूरबार येथे बदली करण्यात आली असून लवकरच त्यांच्यावर गृह विभागाकडून कार्यवाही केली जाईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख