Dysp bankar statement | Sarkarnama

DySP बनकर यांचा राडेबाजांना दम; बदली झालीतरी चालेल, पण सोडणार नाही! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 डिसेंबर 2017

माजर्डे (सांगली): आरवडे (ता. तासगाव) येथे कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहवायासाठी तासगाव उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. बनकर यांनी यावेळी राडेबाजांना जोरदार दम भरला. 

माजर्डे (सांगली): आरवडे (ता. तासगाव) येथे कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहवायासाठी तासगाव उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. बनकर यांनी यावेळी राडेबाजांना जोरदार दम भरला. 

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकित झालेल्या राड्यामुळे गावात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. त्यातच दोन व तीन डिसेंबर रोजी गावात यलम्मादेवीची यात्रा आहे. त्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते म्हणून गावात पोलिस प्रशासनाने प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलताना अशोक बनकर म्हणाले, गावात पक्षीय राजकारण आणू नये. डॉल्बीचा दुष्परिणाम जेष्ठ नागरिक, गरोदर महिलांना होत असतो. त्यामुळे डॉल्बी बंदी असावी. कोणी कायदा सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. मग माझी बदली झाली तरी चालेल. मागील राड्यात गावातील युवक, शासकीय नोकरदारांचा गुन्ह्यात समावेश आहे. सोशल मीडियाचा वापर योग्य पध्दतीने करावा. यात्रा चागल्या पध्दतीने पार पाडा, असे आवाहनही त्यांनी केले. 

पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे म्हणाले, मागील राड्यात गावासह प्रशासनाला नाहक त्रास सहन झाला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी देणार नाही. 

स्वानंदा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुबराव पाटील यांनी नवस म्हणून लहान बाळांना मंदिरावरून खाली झोळीत फेकले जाते, यात मुले अपंग होण्याची शक्‍यता असते यामुळे ही प्रथा बंद करावी अशी मागणी केली. यावेळी सरपंच युवराज दादा पाटील, उपसरपंच पंढरीनाथ वाघ, प्रकाश चव्हाण, जयवंत पाटील कॉन्ट्रॅक्‍टर रामचंद्र पाटील, बालाजी चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख