समीरसाठी मी काहीच मागितलेले नाही, फक्त मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातले विजयाचे गणित सांगितले - गणेश दुधगावकर

समीरसाठी मी काहीच मागितलेले नाही, फक्त मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातले विजयाचे गणित सांगितले - गणेश दुधगावकर

परभणी : मी काही मागण्यासाठी नव्हे, तर मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचे आपण एकेकाळी सहकारी होतो. या नात्यातून आपण परभणी दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. मराठवाड्यातील विजयाची गणिते समजावून सांगितली, असे सांगून राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी खासदार ऍड. गणेशराव दुधगावकर यांनी पक्षांतराच्या चर्चेला पूर्ण विराम दिला. 

राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्ह्यातील मोठे नेते म्हणून माजी खासदार ऍड. गणेशराव दुधगावकर यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. काही दिवसापूर्वीच त्यांचे चिरंजीव समीर दुधगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून स्वतःच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. उच्च शिक्षित, अभ्यासू व युवकांच्या रोजगारासंदर्भात समीर सातत्याने पुढाकार घेत असतात. 

राष्ट्रवादीचे नेते श्री. दुधगावकर यांचा मुलगा भाजपमध्ये गेल्याने आता ते स्वतः भाजपमध्ये जाणार की काय ? अशी चर्चा सुरु झाली होती. परंतू त्यांच्याशी संवाद साधला असता आपण राष्ट्रवादी कॉग्रेस सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्य परभणी येथे आले असता ऍड. गणेशराव दुधगावकर यांनी मुख्यमंत्र्याशी भेट घेतली. नुसती भेटच नाही तर तब्बल एक तास दोघांनी बंद खोलीत चर्चा केली. दुधगावकर - फडणवीस भेटीमुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात दुधगावकरांच्या भेटीचे निरनिराळे अर्थ काढले जात आहेत. परंतू या संदर्भात स्वतः गणेशराव दुधगावकर यांनी आपली व मुख्यमंत्र्याची भेट ही कोणत्याही मागणीसाठी नव्हती असे सरकारनामाशी बोलतांना स्पष्ट केले. समीर दुधगावकर यांचे राजकीय पदार्पण जोरदार व्हावे अशी वडील म्हणून गणेशराव दुधगावकर यांना इच्छा आहे. समीर यांच्या ही बाबतीत कोणतीच मागणी आपण केली नाही. उलट मराठवाड्यातील राजकीय क्षेत्राची आपल्या चांगल्या प्रकारे जाण असल्याने आपण मुख्यमंत्र्यांना केवळ सल्लाच दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com