दुष्काळी दौऱ्यात मंत्री गिरीश महाजन रमले "सेल्फी'त 

दुष्काळी दौऱ्यात मंत्री गिरीश महाजन रमले "सेल्फी'त 

नाशिक ः लोकसभा निवडणुकांची राज्यातील धुमाळी संपल्यावर सत्ताधाऱ्यांना बळीराजाची आठवण झाली. त्यातूनच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी नाशिकला दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान जळगाव नेऊर गावात त्यांनी चक्क कार्यकर्त्यांसमवेत सेल्फीचा आनंद देखील घेतला. 

नाशिक जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. त्यात शेतकऱ्यांच्या बाजूने निवेदनांचा वर्षाव झाला. पालकमंत्र्यांनीही यातील बहुतांश प्रश्‍न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. दिवसभराच्या व्यस्त दौऱ्यायात दुष्काळ व टंचाईने समस्यात भर टाकली आहे. त्यामुळे महाजन यांनी जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध नागरीकांच्या भेटी घेऊन चर्चा केली. 

जिल्ह्यातील 11 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यात एका बाजूला लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसऱ्या बाजूला शेतकरी पाण्यासाठी वणवण फिरत होता. दुर्दैवाची बाब म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी कळवण तालुक्‍यातील काही शेतमजुरांनी मतदान न करताच पोटाची भूक भागविण्यासाठी इतर गावांमध्ये स्थलांतर केले.

सिन्नर तालुक्‍यात माणसे आणि जनावरांनाही पाणीपुरवठा केला जात आहे. मनमाडमध्ये वागदर्डी धरणातील साठा संपुष्टात आल्याने महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील भीषण पाणीटंचाईची स्थिती मनसे नेते राज ठाकरे यांच्या भाषणातून उभ्या महाराष्ट्राने पाहिली. 

यासंदर्भात महाजन यांनी दौऱ्यातुन दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र अतिउत्साही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना त्याचे भान राहिले नाही. यातील अनेक फोटोसेशनच्या मुडमध्ये दिसले. यातील काहींनी सेल्फीही काढल्या. महाजनांना देखील त्यांचा आग्रह मोडता आला नाही. त्यांनीही व्यस्त व धावपळीच्या दौऱ्यात सेल्फीचा आनंद घेतला. 

येवला, इगतपुरी असो की सटाणा सर्वत्र भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुष्काळी दौरा गांभीर्याने घेण्यापेक्षा अतीउत्साही कार्यकर्ते व पदाधिकारी सेल्फीचा आनंद लुटत झाल्याने त्यांना पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचे, दुष्काळाचे आणि बळीराजाच्या संकटाचे गांभीर्य किती, हे उपस्थित शेतकऱ्यांन अनुभवले. 

संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ असताना दुष्काळी उपाययोजनांबाबत सरकार आणि मंत्री निष्काळजीपणा करीत आहेत. दुष्काळी दौऱ्यामध्ये सेल्फी काढून उथळ प्रदर्शन करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत कशी होईल याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. 
-डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभा, महाराष्ट्र 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com