दुष्काळसदृश तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना एसटीचा मोफत पास :रावते

आता शासनाने दुष्काळसदृश म्हणून जाहीर केलेल्या तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी ही सवलत 100 टक्के इतकी देण्यात येईल.
divakar_ravte.
divakar_ravte.

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे.

शासनाने दुष्काळसदृश म्हणून नुकत्याच जाहीर केलेल्या तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सवलत पास देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे केली.

शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पाससाठी सध्या 66.67 टक्के इतकी सवलत देण्यात येते. आता शासनाने दुष्काळसदृश म्हणून जाहीर केलेल्या तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी ही सवलत 100 टक्के इतकी देण्यात येईल. ही संपूर्ण सवलत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार असून त्यासाठी महामंडळावर साधारण 85 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. 

राज्यातील साधारण 35 लाख विद्यार्थ्यांना या सवलत योजनेचा लाभ मिळेल, असे रावते यांनी सांगितले. सध्या शेतकऱ्याच्या आणि ग्रामीण भागीत लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणे हे एसटीचेही कर्तव्य असल्याचे मानून त्यांच्या शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांना दिलासा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

त्यानुसार उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी मासिक पाससाठी 100 टक्के सवलत देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com