चोरटे, गुन्हेगारही फिरकेनात : `वर्क फ्राॅम होम`चा असाही परिणाम

पुणे पोलिसांनी जंग जंग पछाडूनही चोऱ्या कमी होत नव्हत्या. कोरोनाचा धसका चोरट्यांनीही घेतला असल्याने त्या पातळ्यावर पोलिसांना शांतता मिळाली आहे.
pune police
pune police

पुणे : कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे मात्र कोरोनाच्या भितीसह वेगवेगळ्या कारणामुळे मागील आठ दिवसात शहरातील वाहनचोरी, घरफोडी व जबरी चोरीच्या घटना निम्म्याने कमी झाल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे.

शहरामध्ये गेल्या काही वर्षापासून घरफोडी, रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरीकांकडील मौल्यावन वस्तु व पैशाची होणारी जबरी चोरी, लूटमार, रस्त्यावर घड़नारे भांडने, मारहानीचे गुन्हे घड़ण्याचे प्रमाण सातत्याने वाढत होते. संबंधित गुन्हे कमी करण्याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. के. व्येंकटेशम, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी वेळोवेळी झालेल्या बैठकित दिले होते. त्यानुसार त्यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविन्यात त्यांना यश आले. परंतु या घटना घडतच होत्या.

दरम्यान, शहरामध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग वाढला. हा संसर्ग टाळण्यासातठी जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये, कंपन्या, आस्थापना बंद करण्यावर भर दिला. तसेच खासगी कार्यालयातील नोकरदार व कर्म चार्याना "वर्क फ्रॉम होम' करन्यास सांगन्यात आले. परिणामी मुले, आई-वडील असे सर्व कुटुंबच घरी थांबत आहेत. त्यामुळे चोरटे व गुन्हेगार यांना गुन्हे करण्याची संधी मिळत नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

एरवी शहरात दररोज किमान दोन ते तीन घरफोडीचे गुन्हे घडतात. तर दररोज किमान तीन ते चार दुचाकी वाहने चोरीला जातात. तसेच पीएमपी बसप्रवाशांकडील ऐवज लांबविणे, रस्त्यावरून जात असलेल्या नागरिकांचे मोबाईल, सोनसाखली हिसकावणे अशा प्रकारचे गुन्हे घडत असतात.परंतु कोरोनामुळे मागील आठ दिवसात घरफोडी, वाहनचोरी, लूटमारीच्या घटना निम्म्याने कमी झाल्या. किरकोळ स्वरूपाची भांडणे, मारामाºया अशा प्रकारचे गुन्हे गेल्या दोन ते तीन दिवसांत कमी झाले आहेत. मागील आठ दिवसात दिवसात पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्हाचे प्रमाण तीस ते चाळीस टक्के इतके कमी झाले आहे.

एरवी प्रत्येक दिवशी शहरामध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी, मारहाण यांसख्या 25 घटना घडत असे.रविवारी (ता.23) शहरात 10 घटना घडल्या, तर सोमवारी दिवसभरामध्ये केवळ 4 घटना घडल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे (गुन्हे) यांनी सांगितले.

"शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार नागरिक आपल्या घरात थांबणे पसंत करीत आहेत. घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे घरफोडी,  जबरी चोरी, वाहनचोरी प्रमाण घटले आहे.वरिष्ठ पोलिस अधिकारी ते पोलिस कमर्चारी रस्त्यावर मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे सर्व प्रकारचे गुन्हे कमी  होण्यास मदत होऊ लागली आहे," असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com