this is the drama by harshwardhan patil : Bharane | Sarkarnama

ही तर हर्षवर्धन पाटील यांची नौटंकी : दत्तात्रेय भरणे यांची टीका

ज्ञानेश्वर रायते
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

भवानीनगर,: कालवा सल्लागार समितीत मी जसा सदस्य आहे, तसेच हर्षवर्धन पाटील हेही सदस्य आहेत, मात्र धरणाच्या इतिहासात उन्हाळ्यात यावर्षीएवढे पाणी कधीच मिळाले नव्हते, असे असूनही 20 वर्षे तालुक्यासाठी काहीच न केलेले आता नौटंकी करीत आहेत अशी टिका इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली. 

हर्षवर्धन पाटील यांनी रास्ता रोको करून आमदार भरणे यांच्या निष्क्रियतेचे रेकॉर्ड नोंदवा अशी टीका केली होती. त्यास आज भरणे यांनी सणसर येथील कार्यक्रमात व त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले. 

ते म्हणाले, संपूर्ण उन्हाळ्यात एकही दिवस कालवा बंद राहीला नाही, पाणी पोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र इंदापूरातील सर्व जनतेला हा कालवा संपूर्ण उन्हाळाभर सुरू होता हे माहिती आहे. यावर्षी देखील धरणे भरली असली तरी पाऊस थांबला आणि त्यामुळे तलाव कोरडे राहीले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

माझ्याप्रमाणेच माजी मंत्री पाटील हेही कालवा सल्लागार समितीत सदस्य आहेत. कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री आहेत. कालवा सल्लागार समितीत येऊन त्यांनी सूचना करायला हव्या होत्या, मात्र बैठकीत यायचे नाही, शिवाय सरकारवर टिका करण्यापेक्षा माझ्यासारख्या छोट्या माणसावर टिका करायची, त्यातून त्यांच्या पोटात अजूनही किती दुखते आहे हेच यातून दिसते, असा टोला त्यांनी लगावला.

मला निष्क्रिय म्हणण्यापेक्षा आपण काय योगदान दिले हे जरा आठवावे. यावर्षी खडकवासला कालव्यातही इंदापूरला पहिले आवर्तन दिले. मात्र पुढे पाऊस पडलेला नाही. लोकांचे आपल्या निष्क्रियतेवरील लक्ष हटविण्यासाठी ही त्यांची नाटके सुरू आहेत. वास्तविक पाणी इंदापूरात परवा आले आणि त्यांनी हायवेवर काल रस्ता अडवला, ही नाटके त्यांनी बंद करावीत. माझ्यासारख्यांची भीती घेऊ नये. 19 वर्षात त्यांनी काय केले हे सर्वांना माहिती आहे. नीरा डावा कालव्याची माहितीच्या अधिकारात दहा वर्षांची आकडेवारी कोणीही घ्यावी. वितरिका ज्या पूर्वी 8 दिवस चालायच्या, त्या आता महिना-महिना चालतात, आता लागवडीचे क्षेत्र वाढलेले आहे. अर्थात यापूर्वी देखील जे पाणी मिळायचे, ते अजितदादा पालकमंत्री होते, म्हणूनच मिळत होते. त्यात हर्षवर्धन पाटलांचा काहीही संबंध नव्हता, असाही दावा भरणे यांनी केला.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख