dr yashwant thorat about maratha farmers | Sarkarnama

मराठा शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचे, हे ठरवून टाकले : डॉ. यशवंत थोरात 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

जनतेचा सरकारवरून विश्‍वास कमी होतो. त्या वेळी संघर्ष उद्‌भवतो. राज्यकर्त्यांनी अशा वेळी त्याचे कारण शोधायचे असते. ठोस पावले उचलावी लागतात. बहुमताने निवडून दिलेल्या सरकारने आता मराठा समाजाचा आवाज ऐकावा. सरकारने जे चांगले केले, त्याची नोंद घेतली आहे.

 -डॉ. यशवंत थोरात 

कोल्हापूर : "नाबार्डचा अध्यक्ष झाल्यानंतर आयुष्यातील सर्वात जास्त संबंध शेतकऱ्यांशी आला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जवळून पाहिले. एक वर्ग सधन, तर दुसरा निर्धन असून, शिक्षण, रोजगार, रोजीरोटी न मिळाल्याने निर्धन वर्ग दबल्याचे दिसून आले. त्या मराठा शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचे, हे ठरवून टाकले,' अशा शब्दांत "नाबार्ड'चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी आपल्या भावना मांडल्या. 

दसरा चौकात ठोक मार्चावेळी बोलताना थोरात म्हणाले, माणूस मुळात शांत स्वभावाचा आहे. तो कधी शस्त्र हातात घेत नाही. पण, जेव्हा घेतो तेव्हा त्याचा स्वभाव बदलतो. शांतता, सुरक्षितता, शिक्षण, रोजगाराची हमी या माणसाच्या मुलभूत मागण्यात आहेत. सरकारने त्या पुरविल्या नाहीत तर सामाजिक अशांतता निर्माण होते. इतिहास सांगतो, की शासन व जनता यांच्यात दुरावा वाढला, की संघर्ष जन्माला येतो. फ्रान्स व रशियन क्रांतीत ते घडले आहे. प्रत्येक संघर्षात प्रचंड शक्ती निर्माण होते, हे लक्षात घ्यावे.'' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख