dr vikas mahatme | Sarkarnama

"टिस ' चा व्हायरल झालेला अहवाल बनावट - डॉ. विकास महात्मे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अभ्यास करीत असलेल्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टीआयएसएस) अद्यापही अहवाल दिलेला नाही, सोशल मिडीयामध्ये व्हायरल झालेला अहवाल बनावट आहे. या खोट्या अहवालाच्या माध्यमातून धनगर नेत्यांना बदनाम करण्याचा हा कट असल्याचा आरोप धनगर समाजाचे नेते व खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केला. 

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करता येणार नाही, असा निष्कर्ष असलेला टाटा सामाजिक विज्ञान संस्थचा म्हणून एक अहवाल सोशल मिडीयावर काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या लेटर हेडवर हा अहवाल प्रकाशित झाला आहे. हा अहवाल बनावट असून टाटा समाज विज्ञान संस्थेचा या विषयावरचा अभ्यास अद्यापही पूर्ण झालेला नाही. टाटा संस्थेचे अभ्यासक आज नाशिकमध्ये आहेत. तेथून ते नांदेडला जाणार आहेत. अभ्यास पूर्ण व्हायचा असताना त्यासंबंधीचा निष्कर्ष कसा येऊ शकतो, असा सवाल डॉ. महात्मे यांनी केला. 

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी संशोधन करून अहवाल देण्याची जबाबदारी राज्य सरकारने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेला दिली आहे. हा अहवाल येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी संशोधन व शोध करण्याचे काम टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतर्फे सुरू आहे. या अभ्यासातून मूलभूत माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. धनगर समाज असलेल्या परिसरांना या संस्थेचे अभ्यासक भेट देत आहेत. 

सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झालेला अहवाल बनावट असून त्यामागे काही राजकीय नेत्यांचा हात आहे. यातून धनगर समाजातील नेत्यांना बदनाम करण्याचा तसेच समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप खासदार डॉ. महात्मे यांनी केला. या अहवालावर समाजातील बांधवांनी विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख