संचारबंदीत डॉ. सुनयना कदम करतात मुस्लीम वस्तीत अखंडीत रुग्णसेवा

डॉ. सुनयना कदम यांनी आपली सेवा अखंडीतपणे सुरु ठेवल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
संचारबंदीत डॉ. सुनयना कदम करतात  मुस्लीम वस्तीत अखंडीत रुग्णसेवा

नाशिक : "कोरोना'च्या धास्तीने शहरातील डॉक्‍टरांनी आपले दवाखाने, क्‍लिनीक बंद ठेऊन घरीच "लॉकडाऊन' राहने पसंत केले आहे. मात्र संचारबंदीच्या या अडचणीच्या काळात जुने नाशिक व भद्रकाली या गरीब, अल्पसंख्यांक, मोलमजूरी करणाऱ्या वस्तीत एक क्‍लिनीक मात्र सेवा देत आहे.

संचारबंदी जाहीर झाल्यापासून त्यांनी एकदाही सुटी न घेता रुग्णांसाठी आपली सेवा सुरु ठेवली आहे. या परिसरात संचारबंदीच्या काळातही सुरु असलेला हा दवाखाना या भागासाठी आधार ठरला आहे. ही सेवा देत आहेत, डॉ. सुनयना धनंजय कदम.

नाशिक शहराटे विविध भाग त्यांची ओळख व स्थितीची जाणीव करुन देणारे आहेत. यामध्ये भद्रकाली, त्र्यंबक दरवाजा, जुने नाशिक हा भाग म्हणजे मजुरी, हातावर पोट असलेला मुस्लीम समाज अन्‌ दाटीवाटीचा गरीबांची वस्ती असलेला भाग. संचारबंदी जाहिर झाल्यावर सर्वाधीक कोंडी व अडचण याच नागरीकांची झाली. मात्र आजारपण, वैद्यकीय सुविधांबाबत मात्र ते आनंदी आहेत. 

कारण आहे येथे संचारबंदी जाहिर झाल्यावर देखील डॉ. सुनयना कदम यांचा दवाखाना सुरुच राहिला. डॉ. कदम यांच्याकडून अतिशय नाममात्र शुल्क घेऊन उपचार केले जातात. या भागात लहान मुले तसेच विशेषतः महिलांसाठी हा दवाखाना सर्वपरिचीत आहे. 

त्यामुळे अनेकांना हा दवाखाना, डॉ. कदम जवळच्या वाटतात. हा जिव्हाळा डॉ. कदम यांनी देखील "कोरोना'मुळे शहर व परिसरातूल बहुतांश दवाखाने बंद असतांना त्यांनी मात्र आपली सेवा सुरुच ठेऊन तो जपला आहे.

"कोरोना' संसर्गाचा धोका लक्षात घेऊन शासकीय स्तरावर मार्चच्या पहिल्या आठवड्यातच शासनाकडून उपाययोजना सुरु झाली. त्यात सर्वप्रथम ज्यांची सर्वाधीक गरज असते, ते फॅमिली डॉक्‍टर्स, गल्लीबोळातील क्‍लिनीक्‍स बंद झाल्या. बहुतांशी सर्वच डॉक्‍टरांनी सेवा बंद करुन घरी लॉकडजाऊन राहने पसंत केले. त्यानंतर राज्य सरकारने डॉक्‍टरांनी सेवा सुरु ठेवाव्यात असे आवाहन केले होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ल्यक्तीगत आवाहन केले होते. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नव्हता. यडॉक्‍टरांना सुरक्षेची हमी व संसर्ग रोखण्यासाठी आवश्‍यक साधने मिळावीत अशी मागणी करण्यात आली होती. 

त्यात शहरातील अनेक रुग्णांची अडचण झाली. काही डॉक्‍टरांनी आपल्या रुग्णांना मेडीकल स्टोअरमध्ये जाऊन तेथून फोन करावा, म्हणजे औषधे सुचविली जातील असे फलक लावले होते. अशा स्थितीत डॉ. सुनयना कदम यांनी आपली सेवा अखंडीतपणे सुरु ठेवल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com