dr. Sujay Vikhe is pay back mood | Sarkarnama

ज्यांनी त्रास दिला त्यांची नाव लिहून ठेवली आहेत  : खा. सुजय विखे

संदीप काळे 
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

..

अहमदनगर:   राजकारणाच्या दुसऱ्या अध्यायात नगर जिल्ह्यात भाजप शिवसेना युतीला सर्व बारा जगावर विजय मिळवून देण्याचे मी, राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्र्यांनी ठरवले आहे . त्या दिशेने  आम्ही कामाला लागलो आहोत . आम्ही नगर जिल्हा काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त करणार आहोत , असे खासदार सुजय विखे  पाटील यांनी सांगितले.  

लोकसभा निवडणूकीत  ताण तणावाचे प्रसंग तुमच्यावर आले , तुम्ही तणावाला कसे सामोरे गेलात असे विचारले  डॉ . विखे म्हणाले, मला कसलाही तणाव नव्हता. मला झिरो पर्सेंट टेन्शन होते . मी अगदी रिलॅक्स होतो. भाजप आणि शिवसेनेच्या संघटनेवर माझा पूर्ण विश्वास होता . भाजप हा संघटनात्मक पक्ष आहे. आणि मी ज्यांच्याबरोबर   राहिलो ते माझ्याबरोबर राहणारच होते .

निवडणुकीपूर्वी तीन वर्ष माझे काम सुरु होते. गावोगावे मी जात होतो. वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून मी घराघरापर्यंत पोहोचलो होतो .  यश मिळेल असा आत्मविश्वास  होता. पालकमंत्री आणि इतरांनी माझे काम खूप मनापासून केले . स्ट्रेस नव्हता .  पण त्रास होतो . जे  त्रास देतात ते  पुस्तकात लिहून ठेवायचे. पे बॅक  इज  पेनफुल . जशी वेळ  येईल तसे आपण उत्तर  देऊ . 

 

'यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा पहिला अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा होता. लोकसभेत अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. याचा फायदा पुढील अधिवेशनात होणार आहे. दिल्लीत विविध भाषिक अतिषय हुशार माणसांची भेट होत असते. खासदारांना दिल्लीत जो मान, प्रतिष्ठा मिळते, ती महाराष्ट्रात मिळत नाही. मुंबईपेक्षा दिल्लीत काम करण सोप आहे, त्यामुळे मला दिल्ली आवडते' असे मत त्यांनी व्यक्त केले . 

तुमचा अजेंडा  काय असे विचारले असता डॉ . विखे म्हणाले, माझा काही अजेंडा नाही . मात्र ज्या पक्षाने आम्हाला मान सन्मान दिला त्या पक्षासाठी काम करायचे .  मी  अविरत जनतेची वैद्यकीय सेवा करुन संघटन वाढवलेले आहे . भाजपा-शिवसेना यांचा विश्वास माझ्यावर होता. त्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेला जी जबाबदारी माझ्यावर देतील ती यशस्वीरित्या पुर्ण करणार आहे. जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदार संघ जिंकुन कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस मुक्त जिल्हा करण्याचा मानस भाजपा- शिवसेना युतीचा आहे.

तुम्ही विधानसभेला प्रचारासाठी राज्यात दिसणार की जिल्ह्यात ,असे विचारले असता ते म्हणाले,  माझे तसे काही ठरलेले नाही . जसे सी एम साहेब सांगतील तसे काम करणार.कारण  तर मी जिल्ह्यातही हेलिकॉप्टर वापरतो .त्यामुळे   सी एम साहेब म्हणाले राज्यात जा तर तेच हेलिकॉप्टर घेऊन बाहेर जाईन . जसे पक्ष सांगेल तसे काम मी करणार आहे. 

यंदा विधानसभा निवडणुकीला भाजप- शिवसेना यांची निश्चित युती होणार आहे. भाजपला 135 जागा मिळतील. शिवसेना भाजप युती सत्तेवर येईल .  तर कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसला 40 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. पुन्हा एकदा भाजप- शिवसेना युतीची सत्ता येईल आणि पुन्हा   देवेंद्र फडणवीस  मुख्यमंत्री होणार' असा माझा ठाम विश्वास व्यक्त केला.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख