डाॅ. विखे मामाच्या गावाला गेले तेथे परजणेंबाबत काय झाले ?

..
Dr._sujay_vikhe
Dr._sujay_vikhe

कोपरगाव (नगर)  : कोपरगाव विधानसभा निवडणुकीसाठी आज आठ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.  गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे उमेदवारी मागे घेतील, अशी चर्चा तालुक्‍यात सुरू होती. 

मात्र, त्यांनी माघार घेतली नाही. तालुक्‍यात प्रथमच काळे- कोल्हे- परजणे- वहाडणे अशी चौरंगी लढत होणार असून, त्यात कोण कोणाची मते कमी करतो व कोण कोणाला फायदेशीर ठरतो, हे येणारा काळच ठरवील; मात्र सध्या तरी काळे-कोल्हे यांच्यातच खरी लढत होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

नगराध्यक्ष विजय वहाडणे निवडणूक लढविणार असल्याचे प्रथमपासून सांगत होते. तशी त्यांनी तयारी करीत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व (कै.) नामदेवराव परजणे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण या वेळची निवडणूक लढविणार असल्याचे राजेश परजणेसुद्धा सांगत होते. 

मात्र, गृहनिर्माणमंत्री विखे पाटील यांनी शब्द टाकला तर परजणे माघार घेतील, अशी चर्चा होती; मात्र असे काही घडले नाही. डॉ. सुजय विखे पाटील काल मामाच्या गावी आले होते व त्यांच्यात खलबते झाल्याचीही चर्चा आहे; मात्र परजणे यांनी माघार घेतली नाही. आता काळे- कोल्हे- परजणे- वहाडणे अशी चौरंगी लढत निश्‍चित झाली आहे.
 

उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार :  दिलीप मारुती तिडके, शरद लोंढे, नारायण आढाव, नानासाहेब आभाळे, प्रभाकर आव्हाड, अल्लुद्दीन खाटीक, ज्ञानदेव आगवन, रावसाहेब टेके.   

रिंगणातील उमेदवार : आशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), स्नेहलता कोल्हे (भाजप), माधव त्रिभुवन (बहुजन समाज पक्ष), शिवाजी कवडे (बळिराजा पार्टी), शीतल कोल्हे (हिंदुस्थान जनता पार्टी), अशोक गायकवाड (अपक्ष), मगन आहिरे (अपक्ष), सुदाम उकिरडे (अपक्ष), अशोक नामदेव काळे (अपक्ष), राजेश सखाहारी परजणे (अपक्ष), राजेश नामदेवराव परजणे (अपक्ष), विजय सूर्यभान वहाडणे (अपक्ष), अलीम शाह (अपक्ष), दीपक साळुंके (अपक्ष), विजय वहाडणे (अपक्ष)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com