आजचा वाढदिवस - डॉ. सुधीर तांबे - आमदार, नाशिक पदवीधर संघ. - Dr. Sudhir Tambe birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस - डॉ. सुधीर तांबे - आमदार, नाशिक पदवीधर संघ.

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 जानेवारी 2019

नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे हे शेती, सहकार, सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थांवर पदाधिकारी आहेत. संगमनेर येथे तीस वर्षांपूर्वी त्यांनी मूकबधिर व देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालयाची स्थापना करून आपल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला. 2009 मध्ये प्रताप सोनवणे लोकसभेत गेल्यानंतर रिक्त झालेल्या नाशिकच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळविला होता. अवघ्या 11 महिन्यांच्या काळात त्यांनी केलेल्या कामांमुळे 2010 मध्ये 34 हजार 390 मतांच्या फरकाने त्यांना विजय मिळाला. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे डॉ. तांबे मेव्हणे आहेत.

नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे हे शेती, सहकार, सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थांवर पदाधिकारी आहेत. संगमनेर येथे तीस वर्षांपूर्वी त्यांनी मूकबधिर व देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालयाची स्थापना करून आपल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला. 2009 मध्ये प्रताप सोनवणे लोकसभेत गेल्यानंतर रिक्त झालेल्या नाशिकच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळविला होता. अवघ्या 11 महिन्यांच्या काळात त्यांनी केलेल्या कामांमुळे 2010 मध्ये 34 हजार 390 मतांच्या फरकाने त्यांना विजय मिळाला. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे डॉ. तांबे मेव्हणे आहेत. 2016 च्या निवडणुकीतही त्यांनी चांगले मते मिळवीत विजय संपादन केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी विविध आंदोलने केली. विशेषतः टोमॅटो उत्पादकांच्या प्रश्नी त्यांचे आंदोलन गाजले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख