चर्चा नव्हे पुरुषार्थानेच सुटेल काश्मीरचा प्रश्न : सुब्रमण्यम स्वामी - Dr. Subramanyam Swami Kashmir News | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

चर्चा नव्हे पुरुषार्थानेच सुटेल काश्मीरचा प्रश्न : सुब्रमण्यम स्वामी

संपत देवगिरे
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

काश्‍मिर प्रश्‍नावर चर्चा कशी होऊ शकते. हा चर्चेचा विषयच नाही. पुरूषार्थाने सोडविण्याचा विषय आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी येथे केले.

नाशिक : काश्‍मिर प्रश्‍नावर चर्चा कशी होऊ शकते. हा चर्चेचा विषयच नाही. पुरूषार्थाने सोडविण्याचा विषय आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी येथे केले.

काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच ज्ञानेश्वर शर्मा यांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य दिल्याने ते चर्चेत येण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या विवेक संवाद संस्थेतर्फे येथील शंकराचार्य न्यास सभागृहात 'असहिष्णूता : सत्य की आभास` या विषयावर स्वामी यांचे व्याख्यान झाले. यावेळी महापौर रंजना भानसी व शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष डाॅ. आशिष कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देण्यात आले. ते बोलत होते.

खासदार स्वामी म्हणाले, ''भारताची एक इंच भुमी देखील कुणालाही देता येणार नाही. किंवा इतरांना तसा अधिकार सांगता येणार नाही, अशी तरतुद भारतीय राज्य घटनेत आहे. 1994 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव सरकारने पाकव्यप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचा ठराव संसदेत मंजुर केला आहे. त्यानुसार पाकव्याप्त काश्मीर भारतात सामिल करणे हाच केवळ विषय आहे. अशा स्थितीत काश्मीर प्रश्नावर चर्चा कशी होऊ शकते? कुणाशी चर्चा करणार? हा देखील प्रश्नच आहे." हा प्रश्न चर्चेने नव्हे पुरुषार्थाने सोडवावा लागेल. तशी मानसिकता सरकारला दाखवावी लागेल, असेही स्वामी यांनी यावेळी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख