डॉ. शालिनीताई पाटील पत्रकारांशी बोलताना सात वेळा रडल्या

कोरेगावच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील पत्रकार परिषद सुरु असताना सातवेळा रडल्या.
डॉ. शालिनीताई पाटील पत्रकारांशी बोलताना सात वेळा रडल्या

सातारा : कोरेगावच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील  पत्रकार परिषद सुरु असताना सातवेळा रडल्या. 

शालिनीताई पाटील यांनी येताना एक वही आणली होती. त्या वहीत त्यांनी शुक्रवारच्या दैनिकांमध्ये ज्या काही बातम्या आल्या होत्या त्याची नोंद केली होती. त्यांच्या राजकीय आयुष्यात साताऱ्यातील पत्रकारांनी सहकार्य केल्याचे सांगत असतानाच त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. त्यांचे जवळचे कार्यकर्ते पोलीस पाटील संभाजी पाटील यांच्या निधनाची माहिती देतानाही त्या रडल्या. 

सभागृहातील माझे बोलणे संपल्यानंतर पंतगराव कदम मला 'झाशीची राणी' संबोधायचे. त्यांची आठवण काढूनही त्या रडल्या. सातारारोड येथील त्यांच्या शिक्षणसंस्थेतील माजी प्राचार्य चंद्रकांत काळे यांचाही उल्लेख त्यांनी केला आणि त्या पुन्हा एकदा रडल्या. 

फाशीच्या वड दुरावस्थेची बातमी वाचून त्या अस्वस्थ झाल्या. आम्हाला त्यागाची जाणीव नाही. स्थानिकांनी यामध्ये लक्ष घालून त्याचे जतन करणे आवश्यक असल्याचे सांगत पुन्हा एकदा त्या रडल्या. लष्कर आणि भारतीय सैनिकांचा विषय त्यांच्या बोलण्यात आल्यानंतरही त्यांना अश्रू अनावर झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com