Dr. Satryjeet Tambe Congress in YIN Summit at Nashik | Sarkarnama

राजकारणात का यायचे, हे कळले तर यश नक्की मिळेल : डॉ. सत्यजीत तांबे 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 4 जून 2018

"राजकारणात का यायचे आहे?, तर म्हणे प्रतिष्ठा मिळते..... सत्ता मिळते. राजकारणात यासाठी यायचे असेल तर ते विचार बदला. समाज, देशासाठी काही तरी करुन दाखवायचे आहे या ध्येयाने राजकारणात आलात तर यश नक्की मिळेल. अनेक युवकांना आपल्याला काय व्हायचे आहे हेच समजलेले नसते. असा गोंधळलेला युवक काय करु शकेल. अशा युवकांच्या जोरावर देशमहासत्ता होईल यावरच माझा विश्‍वास नाही.'' असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. सत्यजीत तांबे यांनी केले. 

नाशिक : "राजकारणात का यायचे आहे?, तर म्हणे प्रतिष्ठा मिळते..... सत्ता मिळते. राजकारणात यासाठी यायचे असेल तर ते विचार बदला. समाज, देशासाठी काही तरी करुन दाखवायचे आहे या ध्येयाने राजकारणात आलात तर यश नक्की मिळेल. अनेक युवकांना आपल्याला काय व्हायचे आहे हेच समजलेले नसते. असा गोंधळलेला युवक काय करु शकेल. अशा युवकांच्या जोरावर देशमहासत्ता होईल यावरच माझा विश्‍वास नाही.'' असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. सत्यजीत तांबे यांनी केले. 

सकाळ माध्यम समुहाच्या डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) च्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. भाषणाऐवजी प्रश्‍नोत्तराच्या स्वरुपात झालेल्या संवादात डॉ. तांबे यांनी आघाडीचे शोध, उद्योग, यशस्वी युवकांची विविध दाखले दिले. ते म्हणाले, ''आपल्याकडे जे पस्तीशीत आल्यावर कळते ते अमेरिकेतल्या युवकांनी वयाच्या सतराव्या वर्षीच नेमके काय व्हायचे, काय करायचे हे ठरवलेले असते. त्यामुळे ते यशस्वी झालेले दिसतात. आपण त्या वयात चाचपडत असतो. ही स्थिती बदलली नाही, तर युवकांची ही फौज दिशाहीन ठरेल," मग त्यांच्या बळावर देश महासत्ता होणार तरी कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

ते पुढे म्हणाले, "मुंबईला जाताना महामार्गावर अनेक युवक पायी साईंबाबांच्या पालखीत जातांना दिसतात. मी सुध्दा साईबाबांचा भक्त आहे. मात्र, ज्या उमेदीच्या वयात करिअर, व्यक्तीमत्वाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्या कालावधीत आपला एव्हढा वेळ त्यासाठी द्यावा का? आपल्याला काय व्हायचे? काय करायचे? हे युवाअवस्थेतच कळले तर नक्की यशस्वी व्हाल. यासंदर्भात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे उदाहरण प्रेरणादायक आहे. त्यांना काय व्हायचे, काय करायचे यावर ठाम होते. म्हणुनचे ते बदलले. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करु शकले. जगात कोणीही त्यांच्याविषयी शंका व्यक्त करु शकत नाही. प्रत्येक युवकाने शक्‍य झाल्यास पहाटे पाचला उठावे. स्वतःविषयी दहा मिनीटे तरी विचार करावा. तसे केले तर दिशा निश्‍चित करणे सोपे होते." 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख