dr milind bhoi start punyajagar project | Sarkarnama

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी 'पुण्यजागर'ची संजीवनी 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

आत्मत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेणारा शैक्षणिक पूनर्वसन प्रकल्प "पुण्यजागर' या नावाने पुण्यातील शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. 

पुणे : आत्मत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेणारा शैक्षणिक पूनर्वसन प्रकल्प "पुण्यजागर' या नावाने पुण्यातील शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. 

नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करणची वेळ येत आहे. या आत्महत्यांची कारणे प्रामुख्याने सामाजिक, राजकिय अथवा आर्थिक असतात. मात्र, एका शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे त्याचे अख्खे कुटूंब आयुष्यभरासाठी दुखःच्या दरीत कोसळते. त्याच्या कुटुंबियांना दोन वेळच्या जेवनाचीही भ्रांत असते. त्यामुळे वडिलांच्या आत्महत्येबरोबरच या मुलांच्या शिक्षणाचाही शेवट होतो. 

ही सर्व परिस्थिती समाजासमोर येते. लोक हळहळही व्यक्त करतात. मात्र, पुढे काय ? याच प्रश्नाने पुण्यातील कै. शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई व्यथित झाले. अशा कुटुंबांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात, असा विचार करुन त्यांनी काही लोकांच्या ओळखीने नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका गाठला. या तालुक्‍यातील तब्बल शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

डॉ. भोई यांनी या सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून चर्चा केली. आत्महत्या करुन वडील गेले, आता या कुटुंबाला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे रहायचे असले तर, मुलांना शिक्षणाशीवाय पर्याय नाही, ही गोष्ट या चर्चेतून डॉ. भोई यांनी हेरली आणि त्यातनू पुण्यजागर प्रकल्पाला सुरवात झाली. या प्रकल्पाचा जाहीर कार्यक्रम पुण्यात येत्या रविवारी होत असून खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख