dr indrajeet mohite criticise de suresh bhosale | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

'कृष्णे'च्या जिवावर 'जयवंत शुगर' मोठा करण्याचा 'भोसले प्रायव्हेट लिमीटेड'चा उद्योग! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सत्ताधार्‍यांनी अंदाधूंदी सुरु केली आहे.

इस्लामपूर (सांगली): कृष्णा कारखान्यावर पारदर्शी कारभाराची स्वप्ने दाखवून निवडून आलेल्या सत्ताधार्‍यांनी अंदाधूंदी सुरु केली आहे. कारखान्याचे निर्णय खासगी ट्रस्टवर घेतले जातात. 'कृष्णे'च्या सत्तेचा उपयोग करुन 'जयवंत शुगर'ला बाळसं आणण्याचा प्रयत्न अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले करीत असल्याचा आरोप 'कृष्णे'चे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी पत्रकार बैठकीत केला.

असाच कारभार राहिला तर लवकरच कृष्णा कारखाना भोसलेंची प्रायव्हेट लिमीटेड कंपनी होईल असेही ते म्हणाले. 

डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, कृष्णा कारखान्याच्या सत्तेवर येताना विद्यमान सत्ताधार्‍यांनी पारदर्शी कारभार करु, कृष्णेला गतवैभव प्राप्त करुन देऊ अशी गोडगोड स्वप्ने सभासदांना दाखवली होती. मात्र सत्तेवर आल्यावर त्यांनी कर्‍हाड दक्षिण व उत्तर मधील बहुतांशी सभासदांच्या ऊस नोंदीमध्ये फरक करुन जाणिवपुर्वक ऊस तोड उशिरा देणे, अडचणी आणणे असला उद्योग सुरु केला आहे. चांगला ऊस जयवंत शुगरला पाठवायचा खासगीत सल्ला दिला जातो. कृष्णेच्या जिवावर जयवंत शुगर मोठा करण्याचा उद्योग सुरु आहे.’  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख