ओवेसींचा बंद लिफाफा प्रकाश आंबेडकरांना सुर्पूद 

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात आज सायंकाळी कादरी यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे लिफाफा सोपवला.
DR-Kadari-Ambedkar
DR-Kadari-Ambedkar

औरंगाबादः वंचित बहुजन आणि एमआयएम यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने या दोन्ही पक्षांमध्ये कुरुबुरी वाढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, असे असतांना एमआयएमच्या प्रस्तावावर प्रकाश आंबेडकरांकडून अद्याप कुठलाच निर्णय जाहीर झालेला नाही. 

त्यामुळे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आज एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे बंद लिफाफ्यातील पत्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकरांकडे सुर्पूद केले आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात जाऊन कादरी यांनी आंबेडकरांची भेट घेतली. 

गेल्या महिन्यात दिल्ली येथे ओवेसी, आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांच्यात बैठक झाली होती. त्यावेळी एमआयएमने 96 जागांचा प्रस्ताव दिला होता. पैकी 76 जागांवर आमचे उमेदवार निवडून येऊ शकतात असा दावा देखील केला होता. त्यावर पक्षाची कोअर कमिटी नेमून निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होत. 

परंतु जागा वाटपा संदर्भात अद्याप कोअर कमिटीकडून कुठल्याच हालचाली दिसत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर एमआयएम वंचित बहुजन आघाडीतून बोहर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. 

मात्र प्रकाश आंबेडकरांनी ही शक्‍यता फेटाळून लावतांनाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे आहेत, आणि ते घेतील तो निर्णयच सर्वमान्य असेल. आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, आणि 26 ऑगस्टला आम्ही जागा वाटप अंतिम करू असे स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातील जागा वाटपा संदर्भातील असदुद्दीन ओवेसी यांचे पत्र असलेला बंद लिफाफा औरंगाबाद येथून एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादीर घेऊन मुंबईला रवाना झाले होते.

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात आज सायंकाळी कादरी यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे लिफाफा सोपवला. 26 ऑगस्ट रोजी जागा वाटपा संदर्भात ओवेसी आणि आंबेडकर या दोन नेत्यांची बैठक होणार आहे, त्यानंतरच जागा वाटप जाहीर केले जाईल असे कादरी यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com