हातावर शस्त्रक्रिया तरीही गडी निवडणूक कामावर हजर !

..
dr-Datkar.
dr-Datkar.

मुंबई :  निवडणूकीची जबाबदारी सांभाळताना कर्तव्यावर असताना अचानक पाय घसरून पडल्याने फ्रॅक्‍चर झाले असले तरी मुंबई उपनगर उपजिल्हाधिकारी डॉ. दादाराव दातकर निवडणूक कामावर हजर झाले आहेत . 

आधी लग्न कौंढाण्याचे या उक्तीप्रमाणे, काहीही झाले तर आधी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचे या भावनेने डॉ. दातकर निवडणूक कामात सहभागी झाले आहेत. त्यांच्यावर 172 अणुशक्तीनगर मतदार संघाची जबाबदारी असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ते काम पाहत आहेत.

26 सप्टेंबरला आरसीएफ स्पोर्टस कॉम्पेक्‍स लोरेटो स्कूल, चेंबर येथे मतदान केंद्र साहित्य वाटप जमा करणे व ईव्हीएम स्ट्रॉग रुम निश्‍चित करण्यासाठी जात असताना रात्री आठच्या सुमाराला अचानक पाय घसरून ते दोन फुट खट्ट्यांत पडले. त्यामुळे त्यांना आरसीएफ, चेंबूर येथील दवाखान्यात  उपचार केल्यानंतर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात प्लॅस्टर करण्यात आले.

नंतर पुन्हा 27 सप्टेंबरला ते नामनिर्देशन अर्ज स्विकारण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयात हजर झाले. 29 सप्टेंबरला पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल होऊन डॉ. वेंगसरकर यांनी मनगटावर शस्त्रक्रिया करत साडेचार इंचाची प्लेट घातली.

पुन्हा 30 तारखेला ते अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात अर्ज स्विकारण्याठी रूजू झाल्याने त्यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. हातावर शस्त्रक्रिया होऊनही राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याबद्दल मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

डॉ. दातकर यांना यावेळी दोन वेळा उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून विभागीय आयुक्त यांच्याकडून गौरवण्यात आले आहे.औरंगाबाद येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम करत असतानाही, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातंर्गत विभागीय स्तरावर प्रथम पारितोषिक मिळाले आहे. जनगणनेचे काम उत्कृष्ट केल्याबद्दलही त्यांना राष्ट्रपतीकडून रजत पदक मिळाले आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी मुंबई म्हणून कार्यरत असताना उत्कृष्ट कार्याबद्दल तत्कालीन महसूल मंत्र्यांनी त्यांच्या कायाची दखल घेतली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com