आंबेडकर स्मारकाचे काम  महिनाभरात सुरू होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - DR. Babasaheb Ambedkar Memorial work will start in one month -CM | Politics Marathi News - Sarkarnama

आंबेडकर स्मारकाचे काम  महिनाभरात सुरू होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 6 डिसेंबर 2017

मुंबई : दादरमधील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एक महिन्याच्या आत स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

मुंबई : दादरमधील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एक महिन्याच्या आत स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

डॉ. आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल के. विद्यासागर राव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दादरमधील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, आमदार राज पुरोहित यांनीही डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. 

प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की," डॉ. आंबेडकर यांच्या राज्यघटनेने प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिला. राज्यघटनेमुळे शक्तिशाली देश निर्माण झाला. जगात भारताकडे कौतुकाने पाहिले जाते."

" देशातील दिन-दलित, इतर मागासवर्गीय शेतकरी अशा शेवटच्या घटकांपर्यंत परिवर्तन करण्याकरता डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेद्वारे शस्त्र दिले आहे. डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेले समतेचे राज्य निर्माण करण्याचे कार्य करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

विधान भवनात आदरांजली 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवारी विधान भवन प्रांगणातील त्यांच्या पुतळ्यास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, विधान परिषद सदस्य नीलम गोऱ्हे, सचिव महेंद्र काज, सचिव राजकुमार सागर, उपसचिव राजेश मडावी आदी मान्यवरांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधान भवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आदरांजली वाहिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख