Dr Ashar devolop a homeopathy dose to prevent from covid19 | Sarkarnama

डॉ. आशर यांचा होमिओपॅथीचा डोस करणार "कोविड 19' चा सामना

Sampat Devgire
रविवार, 26 एप्रिल 2020

येथील गंगापूर रोडवरील आशर होमिओपॅथी क्‍लिनीकतर्फे कोरोना फायटर्सना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मोफत होमिओपॅथीच्या गोळ्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पंधरा हजार नाशिककरांपर्यंत डॉ. आशर यांच्या "इम्युनिटी ब्युस्टर' गोळ्या पोचवण्यात आल्यात.
 

डॉ. आशर यांचा होमिओपॅथीचा डोस करणार "कोविड 19' चा सामना
...
सरकारनाम ब्युरो
नाशिक ः "कोरोना'संसर्गामुळे सगळीकडे संचारबंदी आहे. दिवसेंदिवस ती अधिक कठोर होत आहे. अत्यावश्‍यक सेवा त्यातून वगळल्या. त्यामुळे काम, ड्युटी अथवा अन्य कारणांनी तुम्हाला कामानिमित्त, विविध कारणामुळे बाहेर फिरता, लोकांमध्ये वावरता, तर
तुमच्या कुुटंबाला, तुम्हाला सतत संसर्गाची अनामिक भिती असतेच. मात्र आता अशा नागरीकांत "कोविड 19 या विषाणूचा सामान करील असा होमिओपॅथी डोस येथील डॉ. आशर यांनी तयार केला आहे. हा डोस तुमच्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवतो असे त्यांनी सांगीतले.

येथील गंगापूर रोडवरील आशर होमिओपॅथी क्‍लिनीकतर्फे कोरोना फायटर्सना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मोफत होमिओपॅथीच्या गोळ्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पंधरा हजार नाशिककरांपर्यंत डॉ. आशर यांच्या "इम्युनिटी ब्युस्टर' गोळ्या पोचवण्यात आल्यात. एक डबी प्रत्येकाला देण्यात येत असून सकाळी तीन आणि सायंकाळी तीन गोळ्या असा दिवसाला दोन डोस घ्यायच्या. पाच दिवस गोळ्या गिळायच्या आहेत.

कोरोना विषाणू संसर्ग फैलाव होऊ नये म्हणून लॉक डाऊनमध्ये सेवेत असलेल्यांमध्ये पोलिस, महापालिका कर्मचारी, डबा पोचवणारे, स्वयंसेवक, पत्रकारांना या गोळ्या मोफत देण्यात आल्यात. गोळ्यांचे मोफत वाटप सुरु आहे. डॉ. आशर म्हणाले, की आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार "इम्युनिटी ब्युस्टर' गोळ्यांची निर्मिती केली आहे. गोळ्या जर्मनीहून आयात केल्या जातात. पण गोळ्यांसाठी लागणारे साहित्य मोठ्याप्रमाणात उपलब्ध नसल्याने पोलिस आयुक्त विश्‍वास नागरे-पाटील, उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांचे मोठे सहकार्य लाभले. मुंबईला विशेष वाहन पाठवून साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामुळे क्‍लिनीकमध्ये गोळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

शहरातील कोरोना फायटर्स यांना होमिओपॅथी गोळ्या मोफत उपलब्ध करुन देण्यात आर्ट ऑफ लिव्हिंगचे अविनाश आव्हाड यांनी पुढाकार घेतला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग, महापालिका यांच्या सहभागातून निर्जंतुकीकरणाचा उपक्रम राबवण्यात आला आहे. पॉझिटिव्ह व्हील्सच्या माध्यमातून नेक्‍स्ट जनरेशनचे 54 फूट उंचीवर होणाऱ्या फवारणीचे यंत्र उपलब्ध करण्यात आले होते. याशिवाय आर्ट ऑफ लिव्हिंगचे विजय हाके, ऍड्‌. सुयोग शहा, ऍड्‌. संजय भुतडा, माहेश्‍वरी विद्या भवन यांच्या सहकार्याने 24 हजार 500 घरपोच डबा देण्यात येत आहे. आहारतज्ज्ञ रश्‍मी सोमाणी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजी-पोळी, पुलाव, चटणी, लोणचे तयार करुन डबे पोचवले जाताहेत, अशी माहिती श्री. आव्हाड यांनी दिली.
....

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख