डाॅक्टर अमोल कोल्हेंनी व्यासपीठावरच रुग्ण तपासला आणि प्रिस्किप्शनही दिले....

डाॅक्टर अमोल कोल्हेंनी व्यासपीठावरच रुग्ण तपासला आणि प्रिस्किप्शनही दिले....

जिंतूर : स्वराज्यरक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेत संभाजीराजांची भूमिका करणारे अभिनेते खासदार डाॅ. अमोल कोल्हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत नेत्याच्या भूमिकेत येऊन भाषणे गाजवीत असले तरी ते मूळ डॉक्टर आहेत. त्यांनी  व्यासपीठावरच औषधे लिहून देत एका वक्त्यावर उपचार केले..

राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या सुरू असलेली शिवस्वराज्य  यात्रा अमोल कोल्हे, अजितदादा पवार, धनंजय मुंडे हे गाजवीत असून या फायर ब्रँड नेत्यांच्या यादीत आणखी एक नाव जोडल्या गेले आहे ते अमोल मिटकरी यांचे.  शिवचरित्रकार म्हणून ओळखले जाणारे अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी झाले असून आपल्या पहाडी आवाजात श्रोत्यांची मने जिंकतात.

गेल्या दोन दिवसांत त्यांचा घसा खराब झाल्याचे व ते आजारी असल्याचे  अजितदादा पवार यांच्या लक्षात आले. जिंतूर येथील सभेत मिटकरी यांचे भाषण संपताच अजित दादा यांनी त्यांच्या पीएला मिटकरी यांच्यासाठी गोळ्या घेऊन या असा आदेश दिला. हे ऐकताच अभिनेते ते नेते असा प्रवास करणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या मधील डॉक्टर जागा झाला आणि त्यांनी स्वतः एक कागद घेऊन स्वतः औषधे लिहून दिली आणि मिटकरी यांना याच गोळ्या घ्या असा सल्ला दिला. कोल्हे यांनी  मुंबईच्या जी.एस. मेडीकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com