Dr. Amol Kolhe Birthday 18 sep | Sarkarnama

आजचा वाढदिवस : डॉ. अमोल कोल्हे - खासदार, शिरूर लोकसभा मतदारसंघ.

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

डॉ. अमोल कोल्हे हे मराठीतील एक नामवंत अभिनेते व राजकारणी आहेत. अभिनयाबरोबरच त्यांनी राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे. शिवसेना पक्षातून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. शिवसेनेत ते उपनेते म्हणून काम करीत होते. तसेच 2014 विधानसभा व लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना पक्षाची निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळली होती. पुणे जिल्ह्याचे ते शिवसेना संपर्क प्रमुख होते. 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करून सलग तीन वेळा शिरूर लोकसभा मतदार संघात निवडून आलेले शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरुद्ध  लोकसभेची निवडणूक लढवून त्यांचा पराभव केला आणि

खासदार झाले.

सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षाने त्यांना स्टार प्रचारक केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे ते नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या यात्रेस जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चांगले व्यक्तिमत्त्व, उच्च शिक्षण, ओघवते वक्तृत्व यामुळे तरुणाईला त्यांनी भुरळ घातली आहे. अनेक चित्रपट, नाटके आणि टीव्ही सिरियलमधील मालिकेमधून काम करून त्यांनी अभिनयातही जोरदार मुसंडी मारली आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवरील "राजा शिव छत्रपती' या ऐतिहासिक मालिकेपासून ते प्रसिद्धीस आले. "स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेमध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे. या त्यांच्या दोन्हीही भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख