..अखेर अजित डोवालच रात्री दोन वाजता मशिदित गेले आणि चित्र बदलले

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची मदत कोरोनासारख्या वैद्यकीय संकटातही घ्यावी लागली...
ajit doval ff.
ajit doval ff.

नवी दिल्ली : तबलिकी मरकजचे मुख्यालय असलेला दिल्लीतील निजामुद्दीन भाग सध्या चर्चेत आला आहे. येथूनच कोरोनाची लागण झालेल्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात देशात परसल्याचे दिसून आले. येथील गर्दी कमी करण्यासाठी खुद्द राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांना मशिदित जावे लागले.

या निजामुद्दीनमध्ये १ मार्चपासून येथे कार्यक्रम सुरू होते. जगभरातून मौलवी येत होते. सुमारे  १,५०० जणांचे वास्तव्य १ मार्चपासून होते. पुढचे पंधरा दिवस येथे लोक येतच होते. पंधरा दिवसांमध्ये याठिकाणी १५ हजारांपेक्षा जास्त लोक जमले होते. मात्र, येथून तेलंगणाला गेलेल्यांपैकी आठ जण कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर मरकज हे कोरोनाचे केंद्र बनल्याचे दिसून आले. मात्र तरीही मरकजचे प्रमुख मशीदीमधील मौलानांना क्वारंटाईनसाठी पाठविण्यास तयार नव्हते.

मरकजचे प्रमुख मौलाना साद यांनी दिल्ली पोलीसांच्या विनंतीकडे दूर्लक्ष केले. या परिसरातील बंगलेवाली मशीद रिकामी करण्यास नकार दिला. त्यामुळे शेवटी गृहमंत्री अमित शहा यांनी अजित डोवाल यांना तोडगा काढण्याची विनंती केली. डोवाल यांचे देशातील मुस्लिम संघटनांशी चांगले संबंध आहे. इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक असल्यापासून ते या संघटनांमधील तरुणांना कट्टरतावादापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी काम करताना देशातील अनेक महत्वाच्या प्रश्नांवर मुस्लिम संघटनांशी काम करण्यास त्यांना सांगितले जाते.

काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यावर येथील जनतेशी संवाद साधण्यासाठी डोवालच गेले होते. त्यामुळे गृहमंत्र्यांची सूचना मिळाल्यावर मध्यरात्रक्ष दोन वाजता अजित डोवाल तेथे पोहोचले. त्यांनी मौलाना साद यांची अक्षरश: मनधरणी केली. त्यानंतर ते मशीदीतील १५०जणांना क्वारंटाईन करण्यास तयार झाले.  मरकजकडून १६७ तबलिगी कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली.

अजित डोवाल यांनी या प्रकरणी चौकशीसाठी गुप्तचर विभागातील उच्च अधिकाºयांना पाचारण केले आहे. मरकजमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या कार्यक्रमात एकूण २१६ परदेशी नागरिक उपस्थित होते. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील एकूण ८०० नागरिक उपस्थित होते. यामधील अनेक नागरिक इंडोनेशिया, मलेशिया आणि बांगलादेशमधील आहेत. यामुळे केजरीवाल सरकारने त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे होते.
मुस्लिम धर्माच्या अनुयायांमध्ये इस्लामचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हा तबलिकी मरकज काम करते. मरकजमध्ये प्रमुखाने दिलेल्या आदेशानुसार देश-विदेशातील कानाकोपºयातील मशिदींमध्ये जाऊन इस्लामचा प्रसार केला जातो. यासाठी त्या प्रदेशानुसार कमीटी बनविली जाते. आपल्या प्रदेशात भ्रमण करत लोकांना उपदेश करण्याचे काम येथून गेलेले करतात. त्याचबरोबर नवीन सदस्यांना आंपल्यामध्ये सहभागी करून घेण्याचे कामही ते करतात. त्यामुळे मरकजमध्ये सहभागी झालेले देशातील अनेक मशिदींमध्ये गेल्याचीही भीती आहे.

अजित डोवाल यांनी मरकजच्या प्रमुखांकडून या ठिकाणी आलेल्या सर्वांची यादीही मिळविली आहे. सर्व राज्यांच्या पोलीसांना त्यांच्या भागातील कोण मरकजच्या कार्यक्रमांना उपस्थित होते याची यादी पाठविण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्व शहरांत त्यांचा शोध घेणे सोपे झाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com