दौंडला "राष्ट्रवादी'च्या गावांत फुलले "कमळ'

दौंडला "राष्ट्रवादी'च्या गावांत फुलले "कमळ'

केडगाव : दौंड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आठ पदाधिकाऱ्यांच्या गावात भाजपचे उमेदवार राहुल कुल यांनी 2188 मतांची आघाडी घेतली आहे. थोरात यांचा 746 मतांनी निसटता पराभव झाल्याने या पिछाडीला विशेष महत्त्व आले आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर दोरगे (भांडगाव, 32 मते), महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे (खामगाव, 159), सरचिटणीस पांडुरंग मेरगळ (नंदादेवी, 11), दौंड खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नारायण जगताप (पिंपळगाव, 497), जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम (यवत, 736), दौंड पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश नवले (खडकी, 219), राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास खळदकर (नानगाव, 367), दौंड पंचायत समितीतील राष्ट्रवादीचे गटनेते सयाजी ताकवणे (पारगाव, 167) या पदाधिकाऱ्यांच्या गावात 2188 मतांची आघाडी कुल यांनी घेतली आहे.

अन्य पदाधिकाऱ्यांची भक्कम साथ

राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या गावात चांगली कामगिरी केल्याने रमेश थोरात विजयाच्या जवळ गेले. जिल्हा परिषद सदस्या सारिका पानसरे (पाटस, 1452 मते), दौंड पंचायत समितीच्या सभापती ताराबाई देवकाते (मलठण, 407), जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे (लिंगाळी, 720), राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान (दौंड, 832), बाजार समितीचे सभापती दिलीप हंडाळ (केडगाव, 618), राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार (सोनवडी, 565), महिला व बालकल्याणच्या सभापती राणी शेळके (वाखारी, 140), जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण सातपुते, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा योगिनी दिवेकर (वरवंड, 60), महिला डॉक्‍टर सेलच्या जिल्हाध्यक्षा डॉ. वंदना मोहिते (दापोडी, 84), यांनी 4878 मतांची आघाडी थोरात यांना मिळाली आहे.

प्रदेशाध्यक्षांच्या माहेरात पिछाडी
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे माहेर असलेल्या नांदूर गावात कुल यांनी 229 मतांची आघाडी घेतली. प्रचारात चाकणकर यांनी, "मी दौंड तालुक्‍याची लेक आहे,' अशी आठवण मतदारांना करून दिली होती. सन 2014 मध्ये राहुल कुल यांना वरवंड गावात 1236 मतांची आघाडी होती. मात्र या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वरवंडमध्ये भव्य सभा झाल्याने कुल 60 मतांनी पिछाडीवर पडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com