Dont wait for Commissions Report - Uddhav Thakray | Sarkarnama

मागास आयोगाच्या अहवालाची वाट नका पाहू - शिवसेनेचा सरकारला घरचा आहेर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

मराठा आरक्षणाच्या पाठिशी शिवसेना सक्षमपणे उभी असून सरकारने निर्णय घ्यावा. न्यायालय अथवा आयोगाचे कारण सांगत बसू नये. शेवटी न्यायालय हे विधीमंडळातल्या कायद्याच्या चौकटीत काम करते. असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी शिवसेनेचे मंत्री व नेते मुख्यमंत्री अन राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही ठाकरे यांनी जाहिर केले.

मुंबई : "महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा आगडोंब उसळला असताना मागास आयोगाच्या अहवालाची वाट कसली पाहत बसलायं. विधीमंडळात कायदा करून मराठ्यांसह धनगर, लिंगायत, महादेव कोळी, जंगम व मुस्लिमांच्या मागण्या कायद्याने मान्य करा. राज्याच्या कायदेमंडळाचा हा प्रस्ताव केंद्र सरकारला मंजूरी साठी पाठवा," असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सरकारला केले आहे. 

मातोश्रीवर आज शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षणाच्या पाठिशी शिवसेना सक्षमपणे उभी असून सरकारने निर्णय घ्यावा. न्यायालय अथवा आयोगाचे कारण सांगत बसू नये. शेवटी न्यायालय हे विधीमंडळातल्या कायद्याच्या चौकटीत काम करते. असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी शिवसेनेचे मंत्री व नेते मुख्यमंत्री अन राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही ठाकरे यांनी जाहिर केले.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

►हा विषयकोर्टाच्या अखत्यारित येतो का?

►असा विषय आल्यावर कमिटी नेमतो किंवा तो विषय कोर्टाच्या अखत्यारीत आहे अस सांगणे ही राज्यकर्त्यांची प्रवृत्ती 

►सगळ्यांनी एकत्र मिळून एकमतानं निर्णय घेऊन ती शिफारस केंद्राकडे पाठवावी

►मराठा समाजासोबत इतरही समाजांच्या मागण्यांचा एकत्रित विचार व्हावा

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उद्धव ठाकरे शिवसेना

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख