dont target fadnvis : AJit pawar warns workers | Sarkarnama

वैयक्तिक फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी नको : अजितदादांनी कार्यकर्त्यांना समजावले

मिलिंद संगई
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

बारामती शहर : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज गोविंद बाग या शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानासमोर आयोजित आंदोलनात सहभागी होत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकांना धक्काच दिला. गोविंद बाग या निवासस्थानासमोर आंदोलन असल्याने आज नेमके काय घडणार याची अनेकांना उत्सुकता होती.

बारामती शहर : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज गोविंद बाग या शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानासमोर आयोजित आंदोलनात सहभागी होत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकांना धक्काच दिला. गोविंद बाग या निवासस्थानासमोर आंदोलन असल्याने आज नेमके काय घडणार याची अनेकांना उत्सुकता होती.

.मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज गोविंदबागेसमोर ठिय्या आंदोलनादरम्यान संतप्त आंदोलकांनी आज मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्यांना वैयक्तिक पातळीवर कोणाच्या विरोधात घोषणाबाजी नको असे सांगत वैयक्तिक घोषणा थांबविल्या.

अजित पवार आंदोलनात सहभागी झाल्यानंतर काही जणांनी जोरदार घोषणा दिल्या. अजित पवार यांनीही स्वताः घोषणा दिल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणा सुरु केल्या, मात्र लगेचच अजित पवारांनी हातात माईक घेत कोणाच्याच वैयक्तिक विरोधात घोषणा देऊ नका, अशी विनंती केली, त्या नंतर मात्र कार्यकर्त्यांनी या घोषणा थांबविल्या. 

माध्यमांसह राज्याचे लक्ष या ठिकाणी होते. अजितदादा भल्या पहाटेच पुण्याहून निघाले आणि सकाळी आठ वाजताच गोविंदबाग येथे पोहोचले. `सहयोग` या आपल्या निवासस्थानासमोर आंदोलन होणार अशी मला माहिती मिळाली होती, माझ्या घरासमोर आंदोलन होणार असल्याने त्यात सहभागी होण्यासाठी मी आलो होतो, मात्र पवारसाहेबांच्या घरासमोर आंदोलन स्थळ असल्याचे समजल्यावरुन मी येथे आलो, असे स्वताः अजित पवार यांनीच नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

सव्वा दहाच्या सुमारास अजित पवार आंदोलनस्थळी आले, इतर कार्यकर्त्यांप्रमाणेच रस्त्यावर मांडी घालून बसले, कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर उभे राहत त्यांनी माईकवरुन एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच नाह कुणाच्या बापाच...कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा दिल्या. मराठा समाजातील मुलींनी दिलेले निवेदन स्वीकारत आंदोलनाला आपलाही पाठिंबा असल्याचे सांगत ते बाहेर पडले. खुद्द दादा हे आंदोलनात सहभागी होणार याची कल्पना मोजक्याच लोकांना होती, मात्र कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून ते रस्त्यावर बसल्यान तो बारामतीत चर्चेचा विषय झाला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख