शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळू नका ;किंमत मोजावी लागेल -प्रणिती शिंदे - Don"t play with farmer"s life Praniti shinde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळू नका ;किंमत मोजावी लागेल -प्रणिती शिंदे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

. भाजप सरकार सत्तेत येऊन आता कुठे तीन वर्षे उलटली आहेत. एवढ्या छोट्याच कार्यकिर्दीत यांच्या ढिम्म अन गैरकारभारांना देशातील अन महाराष्ट्रातील जनता वैतागली आहे.

 सोलापूर : शेतकर्यांच्या जीवनाशी खेळु नका ; अन्यथा त्याची किमत मोजावी लागेल असा ईशारा आमदा प्रणिती शिंदे यानी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

आमदार शिंदे म्हणाल्या," भाजप सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ सुरु केला आहे. शेतकऱ्यांना  जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही दुर्दैवी बाब आहे. कॉग्रेस सरकारच्या काळात असे कधीही झाले नव्हते. भाजपाचे सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या हालअपेष्ठा सुरु झाल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता तात्काळ कर्जमाफी द्यावी. अन्यथा सुरु असणारे आंदोलन अधिक तीव्र करु." 

"देशात कॉंग्रेसचे सरकार असताना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. शेतकऱ्यांसाठी नाविण्यपूर्ण योजना राबवून त्यांच्या जीवनात क्रांती घडविली. दुष्काळ, गारपीठ, अवकाळी अशा संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठीशी कॉंग्रेस सरकार ठामपणे उभे राहीले. भाजप सरकार सत्तेत येऊन आता कुठे तीन वर्षे उलटली आहेत. एवढ्या छोट्याच कार्यकिर्दीत यांच्या ढिम्म अन गैरकारभारांना देशातील अन महाराष्ट्रातील जनता वैतागली आहे."

"भाजप सरकारकडून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची मदत नाही. कर्जमाफी नाही. सत्तेच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांना निवडणूकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले. परंतु सत्तेत येऊन तीन वर्षे झाली तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर यांचा आजही अभ्यासच सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत त्यामुळे त्यांची कुटूंबे रस्त्यावर येत आहेत. तरीदेखील या सरकारला काहीच वेदना होत नाहीत. ही अत्यंत खेदाची बाब आहे." 

"शेतकरी बांधवांना कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव मिळावे, यासाठी कॉंग्रेसचा पाठपुरावा   सुरु आहे. कॉंग्रेससह सरकार विरोधी सर्व पक्षांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली. १ जूनरोजी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप सुरु केला आहे. या संपाला पहिल्या दिवसापासून आपला पाठींबा आहे , असेही आमदार  शिंदे म्हणाल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख