कोणी कोणाला अल्टीमेटम देऊन आघाडी होत नाही, वडेट्टीवारांचा आंबेडकरांना टोला 

dont give us altimatam vijay waditiwar warned prakash ambedkar
dont give us altimatam vijay waditiwar warned prakash ambedkar

मुंबई : " कोणी कोणाला अल्टीमेटम देऊन आघाडी होत नाही. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला सांगावे चर्चेसाठी या आम्ही जाऊ त्यांनी फॉर्म्युला सांगावा. हे न करता, इतक्‍या जागा देतो, तारीख देतो यातून आघाडीची लक्षणं दिसत नाही असा टोला कॉंग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज लगावला आहे. 

आंबेडकर हे आघाडी करण्यासाठी अटी घालतील. राष्ट्रवादी कॉंग्रेस नको म्हणतील. ते जर सकारात्मक असतील तर त्यांनी आघाडीसाठी चर्चेला यावे असे आवाहनही त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले. 

विनाअुनदानीत शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता, आम्ही एक वर्ष हे अनुदान दिले होते मी आशिष शेलार यांना याबाबत फोन केला आणि हा विषय निकाली काढण्याची मागणी केली होती. या सरकारने मागील अधिवेशनात शब्द दिला होता, पण त्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षकांना तीव्र आंदोलन करावे लागेल. सरकारने शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ आणली हे सरकारचे अपयश आहे. उशीरा सुचलेलं शहाणपण आहे असेही वडेट्टीवार म्हणाले. 

राज्य सहकारी बॅंकप्रकरणी बोलतान ते म्हणाले, की माझ्या माहितीप्रमाणे माझ्यावर अजून गुन्हा दाखल झाला नाही. मी केवळ सहा महिने संचालक होतो. केवळ एका बैठकीला मी हजर होतो. काय ते चौकशीतून समोर येईल यात नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडेंनीही कारखाने घेतले आहेत मात्र कारखाने उभे राहिल्याने शेतकरी उभा राहिला, पडीक जमीनीत ऊस पिक शेतकऱ्यांनी घेतले. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com