कॉंग्रेसने हीन राजकारण करू नये : जे.पी. नड्डा

केंद्र सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहे. सर्व राज्यांनाही मदतीचा हात देत आहे. देशासमोर वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती आहे. या काळात सरकारच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहण्याची गरज असताना कॉंग्रेस पक्षाकडून हीन राजकारण करण्यात येत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहे.
dont do politics says j p nadda to congress
dont do politics says j p nadda to congress

पुणे : केंद्र सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहे. सर्व राज्यांनाही मदतीचा हात देत आहे. देशासमोर वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती आहे. या काळात सरकारच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहण्याची गरज असताना कॉंग्रेस पक्षाकडून हीन राजकारण करण्यात येत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहे. देशातील सध्याची परिस्थिती नाजूक आहे. या परिस्तथतीत केंद्र सरकार सर्व राज्य सरकारांच्या मदतीने अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने काम करीत असताना कॉंग्रसने टीका करण्याची ही वेळ नाही, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊन लागू करताना स्थलांतरीत होणारे मजूर व असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा विचार व्हायला हवा होता. त्यासाठी आवश्‍यक नियोजन न करताच लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने कोट्यवधी लोकांचे हाल होत असल्याची टीका कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती. त्यावर नड्डा यांनी आक्षेप घेतला आहे.

व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कॉंग्रसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीनंतर पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कोरोनाचा मुकाबला करताना टाळेबंदीमुळे गरीबांचे हात होत आहेत. टाळेबंदी आवश्‍यक होती. मात्र. केंद्र सरकारला त्याचे योग्य नियोजन करण्यात आले नाही. परिणामी हातावर पोट असणाऱ्या कोट्यवधी जनतेचे हाल होत आहेत, अशी भूमिका मांडली.

या बैठकीत गांधी यांनी कॉंग्रेसशासीत राज्यात कोरोनाशी लढताना करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पक्षाने कृती गटाची स्थापना केली असून या माध्यमातून या राज्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कॉंग्रेस शासीत राज्यांनी योग्य त्या उपाययोजान कराव्यात, असे गांधी यांनी यावेळी सांगितले.कोरोनाच्या चाचण्या विश्‍वासार्ह असण्याची गरर त्यांची यावेळी व्यक्त केली. विलगीकरण आणि आवश्‍यक साम्रगीची व्यवस्था राज्य व केंस्द्र सरकारने केली पाहिजे, असे त्यानी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com