'संभाजीनगर का इशू कोर्ट मॅटर, उस पे डिस्कस मत करो'

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या विषयावरून एमआयएम भाजप आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली. संभाजीनगरच्या विषयापेक्षा शहराच्या विकासाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, 'संभाजीनगर का इशू कोर्ट मॅटर है, उसप यहा डिस्कस नको' अशा शब्दात एमआयएमने आपला विरोध दर्शवला.
dont discuss sub judice issue of sambhajinagar says mim
dont discuss sub judice issue of sambhajinagar says mim

औरंगाबाद: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या विषयावरून एमआयएम भाजप आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली. संभाजीनगरच्या विषयापेक्षा शहराच्या विकासाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, 'संभाजीनगर का इशू कोर्ट मॅटर है, उसप यहा डिस्कस नको' अशा शब्दात एमआयएमने आपला विरोध दर्शवला.

एप्रिल महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा सत्ताधारी शिवसेना उचलून धरणार हे स्पष्ट झाले आहे. यावर भाजपने वेगळीच खेळी करत संभाजीनगर करा अशी मागणी महापालिकेच्या सभागृहात लावून धरत शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सहा महिन्यांपूर्वी महापालिकेच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेना-भाजपमध्ये राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेमुळे दुरावा निर्माण झाला आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असा आरोप करत संभाजीनगरचा मुद्दा भाजप हाती घेऊ पाहात आहे.

शहराचे नामकरण करणे हा भाजपचा हेतू नसला तरी या मुद्द्याचा वापर करत शिवसेनेची फजिती करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून आला आहे. संभाजीनगरचा मुद्द्यात नव्याने शहरात पाय रोवू पाहत असलेल्या मनसेनेही उडी घेतली आहे. भाजप, मनसे या दोन्ही पक्षांकडून शिवसेनेचा मुद्दा हायजॅक झाल्यामुळे शिवसेना अडचणीत सापडली आहे.

महापालिकेच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होत असल्या तरी या निवडणुकीची तयारी सगळ्याच पक्षांनी सुरू केली आहे .शिवसेना महाविकास आघाडी सोबत तर भाजप स्वबळावर निवडणुकीत उतरणार आहे .या पार्श्वभूमीवर आज झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा संभाजीनगरच्या विषयावरून शिवसेना भाजप आणि एमआयएम या तीनही पक्षांमध्ये खडाजंगी झाली.

उपमहापौरांनी भाजपला सुनावले 
भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी आजच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा संभाजीनगरचा मुद्दा उपस्थित केला. यावर एमआयएमने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी प्रमोद राठोड यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांना सुनावले. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव जेव्हा महापालिकेने तत्कालिन सरकारकडे पाठवला होता, तेव्हा प्रमोद राठोड काँग्रेसमध्ये होते.

आज संभाजीनगरच्या मुद्द्यावरून सभागृहात आग्रह करणारे राठोड त्यावेळच्या प्रस्तावावर मात्र शांत बसून होते. पक्ष बदलला, सत्ता गेली की भुमिकेत कसा फरक पडतो हे यावरून दिसून आले आहे. राहिला प्रश्‍न औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा, तर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न आहे, ते शिवसेना पूर्ण करणारच. याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि तेच या शहराचे संभाजीनगर असे नामकरण करतील असा दावा देखील राजेंद्र जंजाळ यांनी सभागृहात केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com