आता रडायचं नाही तर लढायला शिका - छगन भुजबळ

आता रडायचं नाही तर लढायला शिका - छगन भुजबळ
पिंपरीः एक दिन वक्त भी आपका गुलाम होगा... या शायरीचा किस्सा सांगत आता रडायचं नाही तर लढायला शिका असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी मंगळवारी जुन्नर येथील जाहीर सभेत केले.

 दरम्यान,जर पुन्हा सत्तेत येणार आहात तर न घाबरता बॅलेटपेपरवर निवडणूका घ्या असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.

नव्या स्वराज्याच्या नव्या लढ्यासाठी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरुन त्यांचा आशिर्वाद घेवून आज करण्यात आली.

ढोलताशांच्या गजर आणि जल्लोषात यात्रेची सुरुवात झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवनेरीवर उपस्थित होते. 

यावेळी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर गडावरील देवीची पुजा व आरती करत नव्या स्वराज्याच्या लढ्याची सुरुवात करण्यात आली. भाजप- शिवसेना सरकारच्या विरोधात पदयात्रा, हल्लाबोल आणि परिवर्तन यात्रा यशस्वीपणे काढल्यानंतर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात शिवनेरीवरुन विरोधाची तुतारी आज फुंकली. 

नंतर जुन्नर येथे यात्रेची पहिली सभा झाली. तीत भुजबळ म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून कर्जमाफी देण्याची घोषणा केली परंतु किती लोकांना मिळाली. आज छत्रपती असते तर यांचा सगळ्यांचा कडेलोट केला असता.विम्याच्या बाबतीत तेच करण्यात आले. 

१४३ कोटी फायदा एका जिल्हयात झाला आहे आणि आज सत्तेतील लोक पीकविमा कंपन्यांवर मोर्चा काढत आहेत.या सरकारने पाच वर्षांत दोन लाख कोटी कर्ज वाढवले आहे. कॉफी डेच्या मालकाने आत्महत्या केली. आज व्यापारीही आत्महत्या करत आहेत. 

मात्र अदानी अंबानी यांनाच चांगले दिवस आले आहेत.कुणाचे आरक्षण कमी करु नका असे सांगूनही आरक्षण कमी केले जात आहे. याचा विरोध आपण केला पाहिजे. पवारसाहेबांनी जे दिले ते काढून टाकण्याचे काम हे सरकार करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com