ब्रिटिशांच्या काळासारखे वागू नका - मोहन भागवत

देश खंडित झाला असला तरी, स्वतंत्र आहे. ते टिकून ठेवणे व शासन व्यवस्थित चालविणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता ब्रिटिशांना दोष देऊन चालणार नाही. जे चांगले वाईट होईल त्याला केवळ भारतीयच जबाबदार राहतील. त्यामुळे ब्रिटिशांच्या काळासारखे वागून चालणार नाही. प्रत्येकाला विचारपूर्वक वागावे लागेल, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
dont behave like british era says mohan bhagwat
dont behave like british era says mohan bhagwat

नागपूर : देश खंडित झाला असला तरी, स्वतंत्र आहे. ते टिकून ठेवणे व शासन व्यवस्थित चालविणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता ब्रिटिशांना दोष देऊन चालणार नाही. जे चांगले वाईट होईल त्याला केवळ भारतीयच जबाबदार राहतील. त्यामुळे ब्रिटिशांच्या काळासारखे वागून चालणार नाही. प्रत्येकाला विचारपूर्वक वागावे लागेल, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महानगरतर्फे गुरुवारी "नवोत्साह2020' हा सामूहिक शारीरिक प्रात्यक्षिक व स्पर्धांचा कार्यक्रम यशवंत स्टेडियम येथे पार पडला. याप्रसंगी सरसंघचालकांनी मार्गदर्शन केले. 

मंचावर महानगर संघचालक सरकार्यवाह भय्याजी जोशी, विदर्भ प्रांताचे संघचालक राम हरकरे, राजेश लोया व सहसंघचालक श्रीधर गाडगे उपस्थित होते. 

भारतीय नागरिकतेचे पालन करणे म्हणजेच देशभक्‍ती असल्याचे संविधान प्रदान करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत केलेल्या भाषणात म्हटले होते. त्या नागरिकतेचे पालक करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या भारताला विश्‍वगुरू पदावर विराजित करायचे असून, हे विशाल स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सरसंघचालकांनी केले. 

नित्यसिद्ध उपासना संघ शाखेचा अविभाज्य भाग आहे. शक्‍तीची उपासना संघसाखेत येणारे स्वयंसेवक करतात. देशाच्या भल्यासाठी जगणाऱ्या स्वयंसेवकाची निर्मिती संघशाखेत होते. केवळ स्वत:चा विकास अशी स्वार्थी धारणा न ठेवणारे हे स्वयंसेवक समाजाचाही सामुहिक विचार करतात. राष्ट्राला परम वैभवसंपन्न करायचे असून, हीच जीवनशैली प्रत्येकाने स्वीकारावी असे आवाहन सरसंघचालकांनी केले. 

याप्रसंगी स्वयंसेवकांनी तालबद्ध गणसमता, नियुद्ध, सामूहिक समता, पदविन्यास, योगासन, मिश्र प्रात्यक्षिक, दंड, समता, व्यायामयोग आदींची प्रात्यक्षिके सादर केले. 

स्पर्धेत घोषपथकाला प्रथम क्रमांक, नंदनवन भागाला द्वितीय तर धरमपेठ व सोलवाडा भागाला संयुक्‍तिक तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला. घोष पथकाने "जयोत्स्तुते' या रचनेचे वादन करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली अर्पण केली. प्रास्ताविक राजेश लोया यांनी केले. वैयक्‍तिक गीत अमर कुळकर्णी यांनी गायले. संचालन उयद वानखेडे यांनी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com