तेव्हढं राफेल अन्‌ अनिल गोटेंचे विचारु नका प्लीज! 

अग्रवाल समाजाच्या राज्यव्यापी महिला अधिवेशनाच्या निमित्ताने आलेले डॉ. भामरे कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलले. यावेळी धुळे महापालिका आणि आमदार अनिल गोटे यांच्याविषयी विचारले असता, तेव्हढा विषय सोडुन बोला. मी त्यावर काहीही बोलणार नाही. माझे उत्तर असेल 'नो कॉमेंटस्‌', असे भामरे म्हणाले. त्यानंतर राफेल प्रकरणावर विचारल्यावर ते उत्तर न देताच वाहिनीचा बूम बाजुला करत चालु लागले. त्यांना पुन्हा त्यावर विचारल्यावर त्याकडे दुर्लक्ष करीत ते गाडीत बसले.
Anil Gote - Subhash Bhamre
Anil Gote - Subhash Bhamre

नाशिक : धुळे महापालिकेच्या निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांतील आरोप, प्रत्यारोपांची धूळ अद्यापही खाली बसलेली नाही. त्याचा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीही चांगलाच धसका घेतला आहे. आज पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, "कृपा करुन अनिल गोटे अन्‌ राफेल विषयी तेव्हढे विचारु नका. माझे उत्तर आहे नो कॉमेंटस्‌,'' 

अग्रवाल समाजाच्या राज्यव्यापी महिला अधिवेशनाच्या निमित्ताने आलेले डॉ. भामरे कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलले. यावेळी धुळे महापालिका आणि आमदार अनिल गोटे यांच्याविषयी विचारले असता, तेव्हढा विषय सोडुन बोला. मी त्यावर काहीही बोलणार नाही. माझे उत्तर असेल 'नो कॉमेंटस्‌', असे भामरे म्हणाले. त्यानंतर राफेल प्रकरणावर विचारल्यावर ते उत्तर न देताच वाहिनीचा बूम बाजुला करत चालु लागले. त्यांना पुन्हा त्यावर विचारल्यावर त्याकडे दुर्लक्ष करीत ते गाडीत बसले. 

नाशिकला 'एचएएल' प्रकल्प आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये 'एचएएल'चा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा बनला आहे. यासंदर्भात प्रश्‍न विचारल्यावर डॉ. भामरे म्हणाले, ''काही दिवसांपासून ओझर येथील हिंदुस्थान एरॉनॅटीक्‍स कारखान्याकडे (एचएएल)'कडे कोणत्याही प्रकारचे कामे शिल्लक राहणार नसल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. प्रत्यक्षात 23 तेजस एअरक्राफ्टचे तब्बल 1 लाख कोटीचे काम एलएएलला देण्यात आलेले आहे." देशातील बंगळूरूसह नाशिकलाच ही कामे होणार असल्याचा दावा त्यांनी केला. 

डॉ. भामरे म्हणाले, "एचएएल प्रकल्पाला काम नसल्याच्या चुकीच्या माहितीवर कोणीही विश्‍वास ठेऊ नये. येत्या दहा ते पंधरा दिवसांत याविषयी अधिकृत घोषणा होईल. 'एचएएल' मध्ये आता काही काम राहिले नसल्याचे, 2020 नंतर हा कारखाना बंद पडेल, असे चुकीचे चित्र रंगविले जात आहे. प्रत्यक्षात एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर, तसेच वायुदलाशी संबंधीत तब्बल एक लाख कोटी रूपयांची ऑर्डर त्यांना देण्यात आली आहे.'' 'एचएएचल'चे प्रकल्प असलेल्या ठिकाणीच याबाबतची कामे होणार असून एचएएलला मिळणाऱ्या कामात नाशिकचाही समावेश असल्याचा विश्‍वासही व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com