Donot sabotage me : Satej Patil | Sarkarnama

पुन्हा  माझा बळी देवू नका : आमदार सतेज पाटील 

सदानंद पाटील
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

 विकास कामाच्या जोरावर 2014 ची विधानसभा निवडणूक लढवली. चांगले वातावरण असल्याने सर्वच गाफील राहिलो आणि पराभवाला सामोरे जावे लागले.

-आमदार सतेज पाटील

कोल्हापूर: "माझ्यासह कार्यकर्त्यांच्या गाफील पणामुळे मागील निवडणुकीत माझा बळी गेला. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा माझा बळी देऊ नका," अशा इशारा आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा मेळवा ड्रीम वर्ल्ड येथे घेण्यात आला. या मेळाव्यास सौ.प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील यांचेसह मतदार संघातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी आमदार पाटील म्हणाले,"  विकास कामाच्या जोरावर 2014 ची विधानसभा निवडणूक लढवली. चांगले वातावरण असल्याने सर्वच गाफील राहिलो आणि पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या जोरावर ज्या नेत्याने 14 महिने जनतेला वेठीस धरले त्याचा पराभव करुन आमदारकी मिळवली."
 
"लोकसभेला ज्यांना मदत केली त्यांनीही फसवले. जी मंडळी फसवाफसवीचे राजकारण करत आहेत, त्यांच्याविरोधात लढण्यास मी पुन्हा तयार आहे. मात्र ही निवडणूक लढण्यापूर्वी सर्वच कार्यकर्त्यांनी झटून काम करावे", असे आवाहन त्यांनी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख