ट्रम्प म्हणतात......मोदी माझे मित्र

आज (सोमवार) पहाटे चारच्या सुमारास ट्रम्प हे जर्मनीहून निघाले. त्यावेळी त्यांनी भारतीयांना संदेश दिला. आज सकाळी बाराच्या सुमारास ते अहमदाबादमध्ये दाखल होत आहेत
Donald Trump Says Narendra Modi is My Friend
Donald Trump Says Narendra Modi is My Friend

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येत असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत आणि भारतातील मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. मोदींचे होमग्राऊंड असणारे गुजरात या महासत्ताधीशाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. 

ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, कन्या इव्हांका आणि जावई जेर्ड कुश्‍नेर यांच्यासह अमेरिकी प्रशासनातील अनेक बडे अधिकारी असतील. ट्रम्प यांच्या या भारत दौऱ्यामध्ये संरक्षण आणि रणनितीक सहकार्याबाबत अनेक मोठे करार होणे अपेक्षित आहे. ट्रम्प हे तब्बल 36 तास भारतामध्ये असतील. 

आज (सोमवार) पहाटे चारच्या सुमारास ट्रम्प हे जर्मनीहून निघाले. त्यावेळी त्यांनी भारतीयांना संदेश दिला. आज सकाळी बाराच्या सुमारास ते अहमदाबादमध्ये दाखल होत आहेत. ट्रम्प म्हणाले, की भारतातील नागरिकांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. आम्ही लाखो नागरिकांना भेटणार आहोत. पंतप्रधान मोदींचीच सोबत मला चांगली वाटते आणि ते माझे चांगले मित्र आहेत. भारत दौऱा हा माझ्यासाठी सर्वांत मोठा इव्हेंट असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com