डाॅन आंबेकर निघाला "आंबटशौकीन` : बारबालांवर लाखोंची उधळण

...
डाॅन आंबेकर निघाला "आंबटशौकीन` : बारबालांवर लाखोंची उधळण

नागपूर : गुन्हेगारी जगतात मोठी दहशत असलेला कुख्यात डॉन संतोष आंबेकर हा आंबटशौकीन निघाला आहे. त्याच्यावर आतापर्यंत दोन मुलींनी बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत तर एका गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या मुंबईच्या गर्लफ्रेंडने पोलिस चौकशीदरम्यानच आंबेकरच्या थोबाडीत हाणली होती. सध्या डॉन आंबेकर एका 17 वर्षाच्या मुलीच्या कानशिलावर पिस्तूल ठेवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह अन्य राज्यातील गुन्हे जगतात कुख्यात गुंड आंबेकरचे प्रस्थ आहे. उपराजधानीत सराफा व्यापारी वर्गात आंबेकरची वेगळीच दशहत आहे. त्यामुळे त्याने आतापर्यंत कोट्यवधी रूपये खंडणीच्या स्वरूपात सराफा व्यापाऱ्यांकडून उकळले आहेत. "प्रोटेक्‍शन मनी' नावाने आंबेकरने व्यापारी जगतात पैसे उकळण्याचा फंडा सुरू केला होता. यासोबत खाली भूखंडावर कब्जा करणे आणि बनावट कागदपत्र तयार करून विकण्याचा गोरखधंदा आंबेकरने सुरू केला होता. खंडणी, वसुली, मर्डर, अपहरण आणि मांडवली (मध्यस्थी) यासाठी डॉन परिचित होता.

मात्र, त्याला आंबटशौक होता. त्याच्या बंगळूरू, गोवा, मुंबई, औरंगाबाद, ठाणे आणि नागपुरात गर्ल्सफ्रेंड्‌स होत्या. तसेच काही तरूणींचे त्याने पिस्तूलच्या धाकावर लैंगिक शोषण केले तर काही तरूणींना ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवले होते. तसेच भाईगिरीच्या धंद्यात असलेल्या महिलांना तो अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी पैसा पुरवित होता.

आंबटशौकीन आंबेकरसाठी महिला दलाल अल्पवयीन मुलींना रग्गड रक्‍कम देऊन हॉटेलमध्ये पाठवित होत्या, अशी माहिती समोर आली आहे. नागपुरातील परिसरातील एका डॉक्‍टर तरूणी केवळ 16 वर्षांची असताना प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिला पिस्तूलचा धाक दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता. त्या तरूणीला शैक्षणिक सुविधा पुरवून डॉक्‍टर बनल्यानंतर इतर कुणाही युवकासोबत लग्न करण्यास मनाई करण्यात आली होती, अशी चर्चा आहे. त्या तरूणीला पोलिसांनी विश्‍वासात घेतल्यानंतर तिने डॉन आंबेकरविरूद्ध बलात्काराची तक्रार दिली. तसेच लक्ष्मीनगरात कॉपर नावाने असलेल्या सलूनमध्ये आंबेकर पार्टनर आहे. सलूनचा मालक विवेक सिंग याने 16 वर्षाच्या मुलीला आंबेकरच्या ऑफिसमध्ये नेले. तेथे डॉनने मुलीला मदत करण्याच्या नावाखाली पिस्तूल दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गुजरातच्या व्यापाऱ्याला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात मुंबईतून अटक केलेली आंबेकरची गर्लफ्रेंड मनिषा चौधरी हिच्या नावाने मुंबईत कोट्यवधीची संपत्ती केल्याची माहिती आहे. या गुन्ह्यात तपास सुरू असताना लग्नाचे आमिष देऊन फसविल्यामुळे संतप्त झालेल्या मनिषाने डॉनच्या थोबाडीत मारून आपला राग शांत केला होता, अशी माहिती आहे.

बारबालांवर लाखोंची उधळण
डॉन आंबेकरला डान्सबारमध्ये बसण्याचा शौक होता. त्यासाठी तो मुंबई आणि गोवामध्ये जात होता. रात्रभर तो बार डान्सरवर लाखोंची उधळण करीत होता. बारमध्ये डॉन आल्याची माहिती मिळताच बारमालकही बारगर्ल्स संख्या वाढवून रात्रभरात लाखोंची कमाई करीत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जुगार अड्‌डा संचालकांकडून "हप्ता'
शहरात गुन्हे शाखेतील काही पोलिस आणि स्थानिक पोलिस ठाण्यातील काही पोलिसांना "सेट' केल्यानंतर जुगार भरविल्या जातो. सेटींगमध्ये लाखोंची रक्‍कम पोलिसांकडे जात असल्याची चर्चा आहे. मात्र, डॉन आंबेकर हा प्रत्येक जुगार अड्‌डा संचालकाकडून "प्रोटेक्‍शन मनी'च्या नावावर लाखोंचा हप्ता वसुल करीत होता. त्याला पैसे देण्यास नकार देण्याची कुण्याही जुगार अड्‌डा संचालकाची हिम्मत नव्हती. त्यामुळे वाममार्गाने कमविलेला पैसा आंबेकर अय्याशीवर उडवित होता.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com