डोंबिवलीत भाजपवर दांडिया फिवर; गर्दी खेचण्यासाठी काय पण! मोफत बस सेवा, हेयरस्टायल आणि मेकअपही फ्री!! 

शहराची अवस्था बकाल झाली असून सत्ताधा-यांनीमतांचा जोगवा मागण्यासाठीदांडिया इव्हेंटवर मनसोक्त पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा किमान प्राथमिक सोयीसुविधांकडे लक्ष दिल्यास "अच्छे दिन ' नाही पण थोडेफार बरे दिवस तरी नागरिकांना अनुभवता येतील. इव्हेंटपेक्षा विकासकामात स्पर्धा करावी.- मनोज घरत, मनसे शहर अध्यक्ष , डोंबिवली.
डोंबिवलीत भाजपवर दांडिया फिवर; गर्दी खेचण्यासाठी काय पण! मोफत बस सेवा, हेयरस्टायल आणि मेकअपही फ्री!! 

डोंबिवली : डोंबिवली शहरात लाखो रुपये खर्चकरून सत्ताधा-यांनी आयोजित केलेल्यादांडिया महोत्सवाची सध्या जोरदारचर्चा सुरु आहे. 

आपल्या दांडिया इव्हेंटकडे अधिक गर्दी खेचण्यासाठी सेना आणि भाजप या दोन्ही पक्षात कमालीची चुरस रंगली असून भाजपाने तर डोंबिवलीत "दांडिया इव्हेंटसाठी काय पण" असा जणू चंगच बांधल्याचे दिसून येते. भाजपाने दांडिया इव्हेंटच्या ठिकाणी पोहचण्यासाठी खास बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. इतकेच नाही तरमहिलांसाठी हेयरस्टाईल आणि मेकअपही फ्री ठेवल्यामुळे भाजपाला दांडियाची चांगलीच झिंग चढली असल्याचे दिसून येते. 

एकीकडे सत्ताधा-यांकडून स्मार्ट सिटीच्या स्वप्नांचा डंका वाजविलाजात असतानाच दुसरीकडे शहर समस्यांच्या बजबजपुरीत अडकले आहे. रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून अपघातांची संख्याही वाढत आहे. असे असताना सत्ताधा-यांकडून लाखो रुपये खर्च करून भव्यदिव्य असे दांडिया महोत्सव आयोजित करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

शिवसेनेतर्फे" डोंबिवली रासरंग " तर भाजपातर्फे "नमो रमो नवरात्री" हे दांडिया इव्हेंट आयोजित करण्यात आले आहेत. आपल्या दांडिया इव्हेंटला अधिकाधिक गर्दी खेचण्यासाठी सेना आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षांमध्ये सध्या राजकीय गरबा सुरू आहे. 

पूर्वेकडील क्रीडासंकुल येथे दांडीया महोत्सवाचा आनंद घेता यावा म्हणून भाजपाने खास सायंकाळच्या वेळेस येथे जाण्यासाठी व येण्यासाठीमोफत बस सेवा उपलब्धकरून दिली आहे. इतकेच नाही तरया ठिकाणी गरब्यासाठी येणा-या महिलांसाठी खास मोफत मेकअप व हेअर स्टाईल कॅम्प आयोजित करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ज्या डोंबिवलीतून भाजपाला भरभरून मते मिळावी, त्या शहरात दांडियाचे कार्यक्रम स्थळ गाठण्यासाठी मुख्य रस्त्यांवरील खड्डयांतूनच नागरिकांनामार्ग काढावा लागत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com