पुण्याची लोकसभेची 'सीट'.. भाजपच्या पथ्थ्यावर??

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि आघाडी युतीच्या गडबडीत चर्चा सुरू झाली जागा वाटपाची. सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली प्रतिष्ठेची जागा म्हणजे 'पुणे' लोकसभा! पुण्याच्या जागेसाठी भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्याची जागा काँग्रेससाठी सोडली आहे. नेमकं काय होणार!? कोणाला तिकीट मिळणार आणि निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला मिळणार हे काळ सांगेलच. पण यानिमित्ताने काही प्रश्नांचा उहापोह..
पुण्याची लोकसभेची 'सीट'.. भाजपच्या पथ्थ्यावर??

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि आघाडी युतीच्या गडबडीत चर्चा सुरू झाली जागा वाटपाची. सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली प्रतिष्ठेची जागा म्हणजे 'पुणे' लोकसभा! पुण्याच्या जागेसाठी भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू आहे.  पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. काँग्रेसकडे एकनिष्ठ खूप! पण शहरभर स्वीकारला जाईल, असा एकही आश्वासक चेहरा नाही. याव्यतिरिक्त धनिक इच्छुकांचीही कमतरता नाही.

त्यातच चर्चा सुरू झाली प्रवीण गायकवाड यांच्या नावाची. खुद्द शरद पवारांनी शिफारस केल्याची. नेमकं काय होणार? कोणाला तिकीट मिळणार आणि निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला मिळणार, हे येणारा काळ सांगेलच. पण यानिमित्ताने काही प्रश्नांचा उहापोह....

पुण्यासारख्या शहरात अचानक बहुजन चळवळीतला मराठा चेहरा समोर येतो तेव्हा अलिकडच्या काळातील मराठा क्रांती मोर्चा आणि नंतर भीमा कोरेगाव सारख्या घटनांवर पवारांनी घेतलेल्या भूमिकांची आठवण होते. पवारांनी घेतलेल्या भूमिका तत्कालीन होत्या की त्यामागे निवडणुकांचा दूरगामी हेतू होता, हा प्रश्न पडतो. मराठा क्रांती मोर्चा सामाजिक ढवळणूक होती. किमान त्यात सहभागी झालेल्या सर्वसामान्य लोकांसाठी तरी! त्यामुळे त्याचा राजकीय फायदा गायकवाड यांना होईलच याची खात्री नाही.

कोरेगाव भीमानंतर दलित मतांची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरेल. त्यामुळे प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या तोंडावर उघडपणे काय भूमिका घेतात, त्याचा परिणाम निकालावर होईल.पवारांनी गायकवाड यांच नाव काँग्रेसकडून सुचवलं, असं मानलं तरी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आयात उमेदवाराला कितपत पाठींबा मिळेल, याबद्दल शंकाच आहे.

भाजपमध्ये इच्छुक अनेक आहेत. भापजचे पक्ष संघटन मजबूत आहे. त्यामुळे उमेदवार कोणीही असला, तरी पक्ष ही जमेची बाजू असेल. सध्याचे सामाजिक वातावरण प्रचंड ध्रुवीकरणाचे आहे. अशा परिस्थितीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की मराठा क्रांती मोर्चा अगर भीमा कोरेगाव यापैकी कोणत्याही घटनेवर भाजपच्या नेत्यांनी वैयक्तिक टिप्पणी टाळली आहे.

याउलट त्यांच्या 'ट्रोल आर्मी'ने हा एकुणच कसा राष्ट्रवादीचा डाव आहे वगैरे कांगावा त्या त्या वेळी केला आहे. पुण्यासारख्या शहरात जिथे नेहमीच ब्राह्मण व ब्राह्मणेतर स्पर्धा (खरेतर वाद) वर्षानुवर्षे सुरू आहे, तिथे या सर्व घटकांचा थेट परिणाम निवडणूक निकालावर होईल.

पवारांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेली गायकवाड यांची शिफारस (म्हणजे किमान अशी चर्चा आहे ज्याला अजून पवारांनी दुजोरा दिलेला नाही), त्यापूर्वी भीमा कोरेगाववर केलेलं भाष्य, पुणेरी पगडीला विरोध आणि मराठा क्रांती मोर्चावर ठेवलेलं मौन हा सगळा योगायोग नक्कीच नसावा. वरकरणी पाहता हे सर्व भाजपच्या पथ्यावर पडणार असं दिसतंय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com