समन्यायी वाटपावर भाजप आमदार फरांदेंचे पंकजा मुंडेंना आव्हान?

भाजपच्या आमदार फरांदे यांनी बिगर सिंचन आरक्षणाची वकिली करीत सिंचनाच्या आरक्षणाला विरोध केला आहे. मात्र भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या मागणीला खोडा घालत आमदार देवयानी फरांदे यांनी थेट पाणी प्रश्‍नात उडी घेत त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे
Does Devyani Farande Giver Challenge to Pankaja Munde Over Water Issue
Does Devyani Farande Giver Challenge to Pankaja Munde Over Water Issue

नाशिक : जायकवाडी धरणापर्यंतच्या गोदावरी खोऱ्यातील 40 टीएमसी पाण्याची तूट आहे. शासनाने ती भरून काढावी. त्यानंतर शिल्लक पाणी नाशिक, नगर, मराठवाड्यात समन्यायी पद्धतीने व पिण्याच्या पाण्यासाठीच विभागून देण्याची मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यांच्या या मागणीने त्यांनी अप्रत्यक्षरित्या माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या भूमिकेला आव्हान दिले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाशिकला विभागीय आढावा घेतला. यावेळी आमदार फरांदे यांनी समन्यायी पाणी वाटपाबाबतचे निवेदन दिले.....''2005 मधील महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यामुळे 2015 व 2018 मध्ये नाशिकमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागले. त्यामुळे नाशिककरांवर मोठा अन्याय झाला असून, शेती व उद्योगांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. नाशिककरांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. 1964 मध्ये जायकवाडी प्रकल्प झाला, त्यानुसार जायकवाडीपर्यंत गोदावरी खोऱ्यात 196 टीएमसी पाणी उपलब्ध होणार होते. परंतु, 'मेरी'ने 2004 मध्ये सादर केलेल्या अहवालात अवघे 157 टीएमसी पाणी उपलब्ध झाल्याचे नमूद करण्यात आले.' असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.

'...त्यामुळे जायकवाडीपर्यंतचे गोदावरी खोरे 40 टीएमसीने तुटीचे निर्माण झाल्याने 40 टीएमसी तूट भरून काढल्यानंतर पाणी समन्यायी पद्धतीने शिल्लक पाणी नाशिक, नगर व मराठवाड्यासाठी विभागून द्यावे. जायकवाडीच्या पाण्याचे नियोजन करताना गंगापूर धरणाच्या संपूर्ण पाणीसाठ्याचा विचार केला जातो. गंगापूर धरणात 600 दशलक्ष घनफूट मृतसाठा असल्याने तो वापरता येत नसल्याची बाब दुर्लक्षित केली जाते.' असे सांगत धरणातील संपूर्ण पाण्याचा विचार होत असल्याने नाशिककरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे सहाशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा गाळ घोषित करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे

मराठवाड्यातील नव्या जलसंपदा प्रकल्पांना मंजुरी मिळावी. मंजुर प्रकल्पांना गती द्यावी यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे लाक्षणीक उपोषण केले होते. त्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांनी उपस्थित राहून पाठींबा दिला होता. एका स्वतंत्र चर्चेत गोदावरी खोऱ्यातील या प्रकल्पांच्या मागणीस जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन दिले होते. 

मात्र, भाजपच्या आमदार फरांदे यांनी बिगर सिंचन आरक्षणाची वकिली करीत सिंचनाच्या आरक्षणाला विरोध केला आहे. मात्र भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या मागणीला खोडा घालत आमदार देवयानी फरांदे यांनी थेट पाणी प्रश्‍नात उडी घेत त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यावरुन राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com