`काॅंग्रेस सत्तेत सहभागी होणार? हे सगळं चाललयं कशासाठी!`

काॅंग्रेसच्या म्हणण्यानुसार शिवसेनेने आपलेआक्रमक हिंदुत्व कुलूपबंद केले तर राज्यात तीन पक्षांचे सरकार स्थापन होऊ शकते...
`काॅंग्रेस सत्तेत सहभागी होणार? हे सगळं चाललयं कशासाठी!`

पुणे : राज्यातील सत्ती समीकरणाचे गणित आता शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या तीन पक्षांभोवती फिरत आहेत. या समीकरणात काॅंग्रेस सत्तेत सहभागी होणार की बाहेरून पाठिंबा देणार, याविषयी उत्सुकता आहे. याबाबत वरिष्ठ काॅंग्रेस नेत्याला `सरकारनामा`ने सत्तेत सहभागाविषयी प्रश्न विचारला असता हे सगळं कशासाठी चाललयं, अशा शब्दांत काॅंग्रेस सत्तेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले.

काॅंग्रेसचे  आमदार जयपूर येथून आज सकाळी मुंबईला पोहोचण्यासाठी निघाले. त्यातील काही आमदार काल रात्रीच मुंबईत पोहोचले होते. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या प्रत्येक आमदाराशी शिवसेनेसोबत जाण्याविषयी बोलल्या. या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार जवळपास प्रत्येक आमदाराने शिवसेनेला पाठिंबाच नाही तर सत्तेत सहभागी होण्याची गरज सोनिया गांधींकडे व्यक्त केली. ज्या आमदारांच्या मतदारसंघात मुस्लिम मतदार जास्त आहेत, अशा आमदारांनीही अनुकूलता दर्शवली. काॅंग्रेसचे सगळे ठरले आहे. फक्त सत्तावाटपाच्या सूत्रानंतर सारे चित्र स्पष्ट होईल, असे या नेत्याने सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सगळी सूत्रे आता आपल्याकडे घेतली आहेत. त्याची काॅंग्रेसला सध्या तरी काही अडचण नाही. योग्य वेळी काॅंग्रेस नेते चर्चा करून पक्षाला योग्य तो वाटा मिळवून देतील, असा विश्वासही या नेत्याने व्यक्त केला. तरुण आमदारांसह ज्येष्ठ नेतेही सत्तेत सहभागी होण्यासाठी तयार असल्याने त्याविषय़ी पक्षात एकमत असल्याचे या नेत्याने स्पष्ट केले. 

राष्ट्रवादीसोबत काॅंग्रेसच्या नेत्यांनी काल मुंबईत चर्चा केली. काॅंग्रेसचा आग्रह हा समान कार्यक्रमाचा आहे. तर राष्ट्रवादीला सत्तावाटपाचे सूत्रही त्यासोबत महत्त्वाचे आहे. त्यानुसार वाटाघाटी होणार आहेत. या समान कार्यक्रमात आक्रमक हिंदुत्वाला लगाम, स्थानिकांच्या मुद्यांविषयी जास्त न बोलणे, मुस्लिमांविषयी सख्य आदी मुद्यांचा समावेश असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com