काहीही करा पण क्रेडिट कार्डचे बिल भरा : अन्यथा लाखाला तीन महिन्यांत एवढा भुर्दंड!

रिझर्व्ह बॅंकेने ग्राहकांसाठी विविध कर्जांचे हप्ते भरण्यासाठी दिलेली तीन महिन्यांची मुदत ग्राहकांच्या फारशी फायद्याची नसल्याचे अनेकांचे मत आहे. फारचअडचणीत असलेल्या ग्राहकानेच त्याचा विचार करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
shaktikant das
shaktikant das

पुणे : रिझर्व्ह बँकेने गृह तसेच वाहन कर्जाचे हप्ते भरण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतरही अनेक कर्जदारांना हप्ते भरण्याबाबतचे मेसेज आल्यामुळे कर्जधारक संभ्रमात पडले आहेत. हप्ते भरण्याला मुदतवाढ मिळाली तरी त्यावरील व्याज सुरूच राहणार आहे.

रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीय तसेच नागरी सहकारी बँकासह इतर बँकांना केवळ आवाहन केले असून धोणात्मक निर्णय घेण्याचा आधिकार बँकांना असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या तीन महिन्यांच्या कालावधीतील व्याज बँका आकारणार शिवाय कर्जफेडीची मर्यादा तीन महिन्यांनी वाढल्याने ग्राहकांना तात्पुरता दिलासा मिळणार असला तरी अंतिमत: बँकांना तीन महिन्याचे अतिरिक्त व्याज मिळणार आहे.

या संदर्भात रिझर्व बँकेने सल्ला वा सूचना न करता सर्व बँकांना थेट आदेश दिले असते तर ग्राहकांमध्ये संभ्रम राहण्यास कोणताच वाव राहिला नसता, असे सांगण्यात येत आहे. देशात सध्या वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती आहे. उद्योग व्यवसाय बंद आहेत. कोरोनामुळे गृह, वाहन कर्जासह इतर कर्जांचे हप्ते भरण्यास बँकांनी कर्जदारारांना तीस जूनपर्यंत मुदनवाढ द्यावी, अशी सूचना रिझर्व बँकेने केली आहे. परंतू रिझर्व बँकेच्या आदेशात स्पष्टता नसल्याने कर्जाचा हप्ता भरण्याबाबत कर्जदारांना बँकांकडून महिन्याच्या सुरवातीलाच कर्जाचा हप्ता भरण्याबाबत मेसेज आणि ईमेल आले आहेत.

या संदर्भात बँकींग क्षेत्रातील तज्ञ विद्याधर अनास्कर म्हणाले, ‘‘ रिझर्व बँकेने याबाबत आदेश काढला नाही. केवळ बँकांना आवाहन केले आहे.वास्तविक रिझर्व बँकेने थेट आदेश काढले असते तर बँकाना स्वत:चे धोरण ठरविण्याची आवश्‍यकता पडली नसती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी रिझर्व बँकेला सूचना केली. त्या आधारे रिझर्व बँकेने सर्व बँकांना थेट आदेश काढण्याचे टाळत केवळ मार्गदर्शक सूचना दिल्या. कोरोनाच्या संकटामुळे कर्जदारांकडून हप्ता प्राप्त न झाल्यास ते खाते अनुत्पादक कर्ज खाते होऊ नये किंवा संंबधित कर्जदाराचे सिबील रेकॉर्ड खराब होऊ नये, यासाठी सवलत देण्यात आली आहे. मुळात रिझर्व बँकेने कोणत्याही कर्जदारास थेट सवलत दिलेली नाही. त्यांनी केवळ बँकाना सवलत दिली आहे. या तीन महिन्याच्या काळात कर्जवसुली झाली नाही तरी अनुत्पादक कर्जाबाबत सवलत दिली आहे. रिझर्व बॅंकेने दिलेल्या सवलतीच्या आधारे बँकांनी आपल्या कर्जदारांना तीन महिन्याच्या कालावधीसाठी ही सवलत देणे अपेक्षित आहे. थेट आदेश नसल्याने कर्जदाराना सवलत कशाप्रकारे द्यायची याबाबतचा धोरणात्क निर्णय बॅंकांनी घ्यायचा आहे.

काही उद्योग, व्यवसाय सध्या बंद आहेत. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्याचा आधिकार बँकांना देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू ठेवण्याबाबत सरकारचे निर्देश आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू असल्यास कर्जाचा हप्ता बँकांना मिळू शकतो. अशा कर्जदारांबाबतही धोरणात्मक निर्णय घेण्याचा आधिकार बॅंकांना आहे.या आधिकारात बँकांनी घेतलेले निर्णय व्यापारी कर्ज, खावटी मर्ज, औद्योगिक कर्ज, खेळते भांडवली कर्ज, व्यक्तिगत कर्ज,तात्पुरती उचल, क्रेडीट कार्ड या सर्व प्रकारच्या कर्जांना लागू होतील.या काळात सीसीच्या खात्याला ३१ मेपर्यंत व्याजात सवलत देण्यात आली आहे. या खात्यावरील ३१ मेपर्यंतचे व्याज ३० जूपर्यंत भरण्याची सवलत ग्राहकाला मिळणार आहे. शिवाय या खात्याला सीसीची मर्यादा वाढवून देण्याची मुभा बँकाना देण्यात आली आहे.’’

क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या क्रेड संघटनेनेही कार्ड पेमेंट स्थगित करू नये, त्याचा बोजा अखेरीस ग्राहकांवरच बसणार असल्याचे सांगितले. त्यांनी त्यासाठी उदाहरण दिले आहे. कार्डावरील रकमेचे हप्ते भरायला मुदत दिली असली तरी त्यावरील व्याज सुरूच राहणार आहे. उदा. तीन मार्च रोजी क्रेडिट कार्डचे एक लाख रुपये थकलेले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या सवलतींचा लाभ घेेऊन ही रक्कम तीन जून रोजी भरली ती एक लाख 15 हजार रूपये होतील. एक लाख मुद्दल आणि 15 हजार (व्याज व इतर चार्जेस) अशी एकूण रक्कम भरावी लागणार आहे. क्रेडिट कार्डसाठी वर्षाला कंप्माऊडींग व्याज दर हा 36 ते 42 टक्के आकारला जातो. तो भरणे टाळायचा असेल तर क्रेडिट कार्डसाठी या सवलतीचा लाभ घेणे ग्राहकाला जास्त भुर्दंड देणारे ठरेल, असे या संघटनेने म्हटले आहे. 

 समजा तुमचे 50 लाख रुपयांचे कर्ज दहा वर्षांसाठी साडे आठ टक्के दराने आहे आणि तुम्ही त्यासाठी एक एप्रिलपासून तीन महिने हप्ते भरले नाही तर तीन महिन्यांनंतर परतफेड करावयाची एकूण रक्कम ही 51 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे तीन महिन्यांतच तब्बल एख लाख रुपयांचा फटका बसू शकतो, असे सांगण्यात आले.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com