या लिंकवर क्लिक करु नका अन्यथा मोबाईल होईल हॅक.... - do not click on this link or mobile will hack warns police | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

या लिंकवर क्लिक करु नका अन्यथा मोबाईल होईल हॅक....

मिलिंद संगई
सोमवार, 20 एप्रिल 2020

कोरोनामुळे अनेकांचे आॅनलाईन वेळ वाढला आहे. त्याचा गैरफायदा घेण्याचे प्रकार सुरू आहेत..

बारामती : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांचा सोशल मिडीयाचा वापर वाढल्याचा फायदा सायबर चोरट्यांकडून घेतला जात आहे. दोन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स प्रिमीयम फ्री डेटा मिळत असल्याची लिंक सध्या व्हॉटसअँपवर फिरत असून या मुळे मोबाईल हॅक होण्याची भीती असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले. कोणीही या लिंकला क्लिक करु नये, अन्यथा फोन हॅक होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली.

या लिंकला जे क्लिक करतात त्या क्षणी मोबाईल हॅक होऊन ती लिंक आपोआप पुढे सेंड होत जाते. सदर लिंक डाऊनलोड  होताच आपल्या मोबाईल मध्ये इटसमायफ्लिक्ल हे अँप आपोआपच इन्स्टॉल होते व त्यातून ही लिंक आपोआपच पुढे पाठवली जात आहे. 
असे अँप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड झाले असल्यास ते तातडीने युनिइन्स्टॉल करावे, असा सल्लाही शिरगावकर यांनी दिला आहे. या द्वारे फसवणूकीची दाट शक्यता असून नागरिकांनी हा मेसेज येता क्षणीच डिलीट करावा व इतरांनाही त्या बाबत कल्पना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

पीएम फंडाबाबतही असाच गैरप्रकार!

कोरोना संकटाच्या काळातही मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी बनावट बेवसाईट तयार करून त्याद्वारे फसवणुकीचे राज्यात ७८ गुन्हे दाखल झाले आहेत.

महाराष्ट्र सायबर सेलने लोकांना सोशल मीडियावर पसरल्या जाणार्या लिंकपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईसाठी मदत करावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र, काही जणांनी बनावट वेबसाईट करण्याचा खोडसाळपणा केला आहे. नागिरकांनी अशा खोट्या लिंकचा अजिबात वापर करू नये, असे आवाहनही सायबर सेलकडून करण्यात आले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमालावली प्रसारित करत असतात. त्यानुसारच मदत द्यावी असे पोलिसांनी म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख