`माझ्या नावाचा वापर करुन पोलिसांना किंवा कोणालाही दमदाटी करु नका`

अजित पवार यांचा जंगी सत्कार बारामतीत पार पडला. संपूर्ण बारामती तालुका दादांच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे चित्र होते.
ajit-pawar-felicitation-at baramati
ajit-pawar-felicitation-at baramati

बारामती : राज्याची अर्थव्यवस्था कमालीच्या अडचणीत आहे, विकास दर घटला आहे, रुपयाचे अवमूल्यन होत आहे, महागाई वाढत आहे, अशा स्थितीत काम करताना जिद्द व चिकाटी ठेवून काम कराव लागणार आहे, काम थोड अवघड असले तरी तिन्ही पक्ष लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.


उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचा बारामतीत आज नागरी सत्कार करण्यात आला, त्याला उत्तर देताना ते बोलत होते. सुनेत्रा पवार, अमोल मिटकरी, विश्वास देवकाते यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 

नशा डोक्यात जाऊ देऊ नका...

माझ्या नावाचा वापर करुन पोलिसांना किंवा इतर कोणालाही दमदाटी करु नका, सत्तेची नशा डोक्यात जाऊ देऊ नका अशा शब्दात अजित पवारांनी सत्तेची नशा डोक्यात जाऊ देऊ नका असे त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले. 

पवार म्हणाले, नियमित कर्ज परतफेड करणारे व दोन लाखांहून अधिक कर्ज घेतलेल्यांच्याही अपेक्षा आहेत, या बाबत मुख्यमंत्र्यासह सर्वांनीच लक्ष घातले आहे, या बाबत आम्ही लक्ष घातले आहे. जीएसटीमध्ये होणारी घट, रुपयाचे होणारे अवमूल्यन, विकासदरात झालेली घट यामुळे आव्हाने मोठी आहेत, मात्र महाविकासआघाडीचे सरकार लोकांच्याअपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. 

बारामती, पुणे व मुंबईसह राज्यात पोलिसांना 500 स्क्वेअर फूटांची घरे देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, त्या दृष्टीने काम सुरु झाले आहे. राज्यातील कोणत्याही माध्यमांच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्याबाबत लवकरच शासन निर्णय घेईल. सर्वांचा याला पाठिंबा आहे. महाराष्ट्रात राहता मग मातृभाषा यायलाच हवी. 

पुरंदरच्या विमानतळाबाबत विरोध लक्षात घेत, योग्य मोबदला देऊन, चर्चा करुन विश्वासात घेऊन हे काम मार्गी लावायचे आहे. बारामती व पुण्यापासून हा विमानतळ 50 कि.मी. वर येईल त्याचा पश्चिम महाराष्ट्राला फायदा होईल. बारामती फलटण रेल्वे भूसंपादन व पालखी मार्गाचे काम वेगाने मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. बारामतीनजिक कॅन्सर हॉस्पिटलसाठी 25 एकर जागा शोधतो आहोत. मेट्रोच्या कामाला निधी उपलब्ध करुन द्यायचा आहे, प्रश्न आ वासून उभे आहेत पण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न निश्चित करु. नीरा डावा कालव्याच्या पाण्याबाबत अधिक बोलत नाही मात्र शेतक-यांनी चिंता करण्याचे कारण नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 कोटी 54 लाखांचा निधी या वेळी प्रदान करण्यात आला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com