ड्युटीवरील पोलिसांना सतावणारा प्रश्न, `कोरोनाचा विषाणू घरी घेऊन तर जात नाही ना?'

आम्ही पोलीस आणि सर्व प्रशासकीय लोक केवळ जनतेच्या रक्षणार्थ स्वतःच जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहोत. आजही कर्तव्य करुन घरी परत गेल्यावर भीती वाटते की, मी आज दिवसभर कित्येक लोकांच्या सानिध्यात आलो. त्यामुळे मी तर कोरोनाचा विषाणू घरी घेऊन तर जात नाही ना? बायको आणि मुलांना सुद्धा जवळ येऊ देत नाही. परिवारापासून लांब लांब राहतो. आज आमची स्थिती वाळीत टाकलेल्या एखाद्या व्यक्तीसारखी झाली आहे.- श्रीकांत हत्तीमारे, उपनिरीक्षक, रामटेक पोलीस ठाणे
Do i carrying coronovirus to home asks police on duty to self
Do i carrying coronovirus to home asks police on duty to self

नागपूर: `आम्ही पोलीस आणि सर्व प्रशासकीय लोक केवळ जनतेच्या रक्षणार्थ स्वतःच जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहोत. आजही कर्तव्य करुन घरी परत गेल्यावर भीती वाटते की, मी आज दिवसभर कित्येक लोकांच्या सानिध्यात आलो. त्यामुळे मी तर कोरोनाचा विषाणू घरी घेऊन तर जात नाही ना? बायको आणि मुलांना सुद्धा जवळ येऊ देत नाही. परिवारापासून लांब लांब राहतो. आज आमची स्थिती वाळीत टाकलेल्या एखाद्या व्यक्तीसारखी झाली आहे,  ही व्यथा मांडली रामटेक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे यांनी.  

जनतेला आवाहन करताना श्रीकांत म्हणाले की प्रशासनाला सहकार्य करून कृपया घरातच थांबावे. आपण मिळूनच कोरोना वर मात करू शकतो. हे सगळं जनतेच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. कित्येक गावांमध्ये ज्यावेळी मी पेट्रोलिंग करत असतो त्यावेळी मला असे दिसून येते की काहीही कारण नसताना उनाड मुले टिंगल टवाळक्या करत एकत्र जमलेले असतात आणि पोलीसांची गाडी आल्याचे बघून पळून जातात. तिथून निघून गेल्यावर परत जैसे थे स्थिती होते. त्यांना बघून असे वाटते की यांनी अजूनपर्यंत या रोगाविषयीचे गांभीर्यच ओळखले नाही. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहीजे की, हे फक्त जनतेच्या रक्षणाकरिता आम्ही सोसत आहोत. तेव्हा जनतेचे सुद्धा हे कर्तव्य आहे की त्यांनी स्वतः घरी राहून आम्हाला सहकार्य करावे. कारण जर आपण स्वयंशिस्त पाळली नाही तर पुढे परिस्थिती यापेक्षा ही भयावह होणार आहे.

गावात एकाला जरी या रोगाची लागण झाली तर संपूर्ण गाव चा गाव हा त्याच्या विळख्यात येईल. त्यामुळे आपली स्वतःची चूक ही आपल्या कुटुंबाला, मोहल्याला, गावाला, शहराला, राज्याला, आणि देशाला खूप खूप महागात पडेल. त्यामुळे तुमची स्वतःची खबरदारी तुमचे आणि तुमच्या प्रियजनांचे जीव वाचविण्यासाठी आहे. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा. लाॅकडाऊनचे नियम पाळा, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता जे काही आवश्यक बाबी आहेत त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com