दिवाकर रावते म्हणतात, 'तानाजीं'शिवाय 'शेलारमामां'ना महत्त्व नाही  !  

श्री. रावते यांनी गंगापूर तालुक्‍यात पाहणी केली असता, बॅकवाटरचे पाणी शेतात घुसल्याने मका, कपाशी, ऊस पिकात आजही पाणी असल्याचे सांगितले. मात्र, सोबतच नुकसानीपेक्षा मराठवाडा जलमय झाल्याचे समाधान असल्याचीप्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत हेही सांगायला रावते विसरले नाही.
Shivsena Diwakar Raote
Shivsena Diwakar Raote

औरंगाबाद  : शिवसेनेचे संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तूळात चांगलेच चर्चेत आहेत, मात्र दिवाकर रावते यांना कोणती संधी असेल ? या पत्रकाराच्या प्रश्‍नावर श्री. रावते यांनी 'तानाजीं'शिवाय 'शेलारमामां'ना महत्त्व नाही, असे उत्तर दिले . मात्र तानाजी कोण आणि शेलारमामा कोण हे त्यांनी स्पष्ट केले नाही . 

 भावी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार आहे, तसेच शिवसेनेशिवाय सत्ता कुणालाही शक्‍य नाही, असा दावा केला. परतीच्या पावसाने झालेल्या पीकांच्या नुकसानीची श्री. रावते यांनी गंगापूर तालुक्‍यात पाहणी केली, त्यानंतर औरंगाबादेत सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना श्री. रावते म्हणाले, की आघाडी असो की महाशिवआघाडी अशा कोणत्याही आणि कितीही आघाड्या असो, कोणी कितीही दावे करोत, मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. राज्यातील जनतेने तसा कौल दिल्याचेही सांगत शिवसेना येणाऱ्या पाच वर्षात राज्यातील सर्वच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

सर्वे पूर्ण मात्र ,अहवाल अपुरा

विभागीय आयुक्तांकडून आपण माहिती घेतल्याचे सांगत जिल्हाभरात 98 टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत, मात्र काही लोक बाहेरगावी असल्याने त्यांचे पंचनामे होऊ शकले नाहीत, अशा परिस्थितीत उपलब्ध पंचनामे (सर्वे) हे तातडीने वरिष्ठ पातळीवर पाठवावेत, तसेच पिक विमा भरलेले आणि न भरलेले अशा दोन टप्प्यात अहवाल पाठवावा असे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले असल्याचे रावते यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत अशांचा अहवाल पून्हा स्वतंत्र पाठविण्यात येणार आहे.

दानवे देतील बॅंकांना भेटी

2016 या वर्षापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली खरी मात्र अजूनही काही शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याचे चित्र समोर आले असून आपण याचा अहवाल घेतल्याचेही श्री. रावते म्हणाले. उर्वरित कर्जमाफीसाठी शिवसेनेचे अंबादास दानवे हे प्रत्येक बॅंका बॅंकात जाऊन याचा तपास घेऊन अशी प्रकरणे निपटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बॅंकांनी शेतकऱ्यांच्या मागे कर्ज परतफेडीची भुणभुण लावू नये, असे संबंधितांना तोंडी आदेश दिल्याचे रावते यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com