निलमताई, आम्ही मंत्री असताना असे कधी घडले नाही?

या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही वेळेवर उपस्थित नव्हते.
diwakar raote taunts nilam gorhe
diwakar raote taunts nilam gorhe

मुंबई: मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 10 मिनीटे ताटकळत वाट पहावी लागल्याचा प्रकार आज घडला. त्यावरून माजी मंत्री आणि आमदार दिवाकर रावते यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना उद्देशून टिप्पण्णी केली. 

आज विधीमंडळात मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे वेळेवर 10.30 वाजता पोहचले, मात्र त्यावेळी इतर मंत्री उपस्थित नव्हते. त्या मंत्र्यांची वाट पाहत त्यांना 10 मिनिटे ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे माजी मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना विचारणा केली. आम्ही मंत्री असतना असे कधी घडले नाही? मुख्यमंत्र्यांना इतर मंत्र्यांची वाट पहात ताटकळत उभं रहावं लागलं, असं ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com