दिवाकर रावतेंनी गुजराती पुरोहितास शिकवली मराठी आरती अन्‌ दिले धडे! 

राज्याचे परिवहन मंत्री शिवसेना नेते दिवाकर रावते नुकतेच त्र्यंबकेश्‍वराच्या देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्‍वरला आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाकरवी अभिषेक केला. अभिषेकाच्या परंपरेनुसार त्यानंतर ते आद्य ज्योर्तिलींग त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभाऱ्यात आरतीसाठी गेले. यावेळी पुरोहिताने चक्क गुजरातीत आरती म्हण्यास प्रारंभ केला. हे लक्षात येताच दिवाकर रावतेंनी पुरोहिताची चांगलीच हजेरी घेतली.
दिवाकर रावतेंनी गुजराती पुरोहितास शिकवली मराठी आरती अन्‌ दिले धडे! 

नाशिक : राज्याचे परिवहन मंत्री शिवसेना नेते दिवाकर रावते नुकतेच त्र्यंबकेश्‍वराच्या देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्‍वरला आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाकरवी अभिषेक केला. अभिषेकाच्या परंपरेनुसार त्यानंतर ते आद्य ज्योर्तिलींग त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभाऱ्यात आरतीसाठी गेले. यावेळी पुरोहिताने चक्क गुजरातीत आरती म्हण्यास प्रारंभ केला. हे लक्षात येताच दिवाकर रावतेंनी पुरोहिताची चांगलीच हजेरी घेतली. त्यानंतर त्यांनी मराठीमध्ये संपुर्ण आरती केली. यावेळी पुरोहिताची पंचाईत आणि रावतेंच्या पुजेविषयीच्या माहितीने गाभाऱ्यातील गर्दी चांगलीच प्रभावीत झाली होती.

रावते आपला मुलगा व मित्रासह या पुजेसाठी आले होते. त्याची ही पुजा पुर्वनियोजित होती. आधी निश्‍चित केलेल्या पुरोहिताने त्यांच्या उपस्थितीत विधी पूर्ण केला. हा सर्व तास दिड तासांचा पूजाविधी शाश्‍त्रोक्त पध्दतीने पार पडला. त्यानंतर प्रथेप्रमाणे त्यांना त्र्यंबकेश्‍वर मंदिरात दर्शन व पूजेसाठी गेले. हे नित्य नेमाचे काम असल्याने पुरोहिताने आपल्या सहाय्यकास त्यांच्यासमवेत पाठविले. त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभाऱ्यात पुन्हा अभिषेक करण्यात आला. उत्तर पूजेचा भाग म्हणून महादेवाची आरती केली. पुजा सांगणाऱ्या पुरोहिताने थेट गुजरातीत आरती म्हणण्यास प्रारंभ केला. प्रारंभीच्या चार ओळींतच हे लक्षात आल्यावर मंत्री रावतेंनी त्यांना थांबवले. "हे काय चालले आहे?. मराठी येत नाही का?. महाराष्ट्रात राहता, पुजाविधी करता आणि गुजरातीत आरती म्हणता?'' त्यांच्या या वरच्या पट्टीतील विचारणेनंतर पुजा सागंणारा गर्भगळीतच झाला.

त्याने आपल्याला सलगपणे मराठी आरती म्हणता येत नाही याची कबुली दिल्याचे कळते. त्यानंतर मंत्री दिवाकर रावते यांनीच अगदी खड्या आवाजात महादेवाची आरती केली. पुजा, विधी पार पडल्यावर ते मुंबईला रवाना झाले. मात्र, दरम्यानच्या काळात मंदिराच्या गर्भगृहात घडलेला हा प्रकाराचे अन्य पुरोहितांनीच रसभरीत वर्णन करीत सर्वदुर पोहोचविल्याने दिवाकर रावतेंनी गुजरातीत आरती म्हटलेल्या पुरोहिताला दिलेले मराठीचे धडे त्यांच्यातील शिवसेनेचा मराठी बाणा प्रकट करुन गेले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com